हनीमून पॅकेजेस-मेकमायट्रिप

Narendra Wable February 21, 2023 12:00 AM

मेकमायट्रिपने २६ देशांतर्गत व आंतरराष्‍ट्रीय गंतव्‍यांसाठी तयार केले ३०० हून अधिक सानुकूल हनीमून पॅकेजेस

 

·         हनीमूनसाठी येणाऱ्या पर्यटकांना मार्गदर्शन करण्‍यासााठी सर्व महिला असलेल्‍या हनीमून प्‍लानर्सच्‍या विशेष टीमला प्रशिक्षण

·         नवविवाहितांना स्‍टाइलमध्‍ये त्‍यांच्‍या जीवनाची एकत्र सुरूवात करण्‍यास मदत करण्‍यासाठी विशेष सुविधांची भर

·         पॅकेजेस देशांतर्गत गंतव्‍यांसाठी २४,९९९ रूपयांपासून सुरू होतात, तर आंतरराष्‍ट्रीय हॉलिडेजसाठी ४४,९९९ रूपयांपासून सुरू होतात  

फेब्रुवारी  २०२३ – मेकमायट्रिप या भारतातील अग्रगण्‍य ऑनलाइन ट्रॅव्‍हल कंपनीने अचंबित करण्‍याच्‍या वचनासह विशेषरित्‍या तयार केलेले हनीमून उत्‍पादन बकेट सादर केले. ३०० हून अधिक बारकाईने तयार केलेल्‍या प्रवास योजना जगभरातील २६ गंतव्‍यांपर्यंत पसरलेल्‍या आहेत. या योजना हनीमूनसाठी येणाऱ्या पर्यटकांना सर्वोत्तम व रोमँटिक क्षणांचा अनुभव देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आल्‍या आहेत. यामध्‍ये प्रत्‍येकाला जिव्‍हाळ्याच्या क्षणांचा पुरेपूर आनंद घेता येण्‍यासाठी बालीमधील प्रायव्‍हेट पूल विलाज आणि मालदीवमधील बीच विलाज यांसारख्या खाजगी व आलिशान निवासांचा समावेश आहे. पॅकेजेसमध्‍ये रोमँटिक सुविधा व अनुभव देखील आहेत, ज्‍यामधून हनीमूनवर येणारे पर्यटक सक्षम होण्‍यासह प्रत्‍येक जोडप्‍यासाठी अर्थपूर्ण पद्धतीने त्‍यांचा प्रवास सानुकूल करण्‍यास प्रेरणा मिळेल आणि एकत्र नवीन जीवनाच्‍या शुभारंभाचा मनमुराद आनंद घेता येईल.

पर्यटकांच्‍या जिव्‍हाळ्याच्या आणि पारंपारिक हनीमूनच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी एमएमटी हनिमून उष्णकटिबंधीय दक्षिण-पूर्व आशियाई बेटांवर फेरफटका, निसर्गरम्य किनारपट्टीवर सेल्फ-ड्रायव्हिंग, हाउसबोट व ट्रीहाऊस स्‍टे, शॅम्पेनसह सीन रिव्हर क्रूझ, इबिझामध्‍ये स्नॉर्किंग आणि प्रायव्‍हेट हिडन वाइन सेलरमध्‍ये व्हिएनीज वाइन टेस्टिंग यांसारख्या अनुभवांनी भरलेले आहे. यासह इतर सुविधा या खास क्‍युरेट केलेल्‍या हनीमून पॅकेजेसमध्‍ये आहेत.

तसेच, जगभरात प्रवास केलेल्‍या १००० हून अधिक सर्व महिला हॉलिडे तज्ञांच्‍या संपन्‍न टीमने हे सानुकूल पॅकेजेस तयार केले आहेत आणि दक्षिण आफ्रिेकेमधील द्राक्षबागा, काश्मीरचे बर्फाच्छादित पर्वत किंवा मालदीवचे निळेशार किनारे अशा सर्व स्‍वप्‍नवत गंतव्‍यांची पूर्तता करणाऱ्या स्‍वप्‍नवत हनीमून गंतव्‍यांकरिता विनासायास नियोजनामध्‍ये मदत करतात. यामध्‍ये साहस, वाळवंट, समुद्रकिनारे, डोंगराळ गेटवे, शहरी भाग अशा आवडत्‍या पर्यटन स्‍थळांचा देखील समावेश आहे.

‘‘आम्हाला जोडप्यांना त्यांच्या हनीमूनसाठी आयुष्यभराच्या आठवणी निर्माण करण्याचे महत्त्व माहित आहे आणि आमचा प्रयत्न प्रत्येक जोडप्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तयार केलेले पॅकेजेस ऑफर करण्याचा आहे, ज्यामुळे त्यांना पारदर्शक किंमती व सानुकूल करण्यायोग्य प्लॅटफॉर्मच्‍या माध्‍यमातून ऑनलाइन माहितीपूर्ण निर्णय घेता येतील,’’ असे मेकमायट्रिपच्‍या हॉलिडेज अॅण्‍ड एक्‍स्‍पेरिअन्‍सेसचे व्‍यवसाय प्रमुख जस्‍मीत सिंग म्‍हणाले.  

याव्यतिरिक्त, एमएमटी हनीमूनमध्ये अनेक पूर्व-खरेदी केलेल्या इन्व्हेंटरीचा समावेश आहे, जे निश्चित उपलब्धतेची खात्री देतात आणि संभाव्य प्रवाशांचे खात्रीशीर कॅबसह फ्लाइट व हॉटेल्समधील किंमतीमध्‍ये होणाऱ्या चढ-उतारापासून संरक्षण करते. प्रेमीयुगुलांना विनासायास प्रवासाची खात्री देण्‍यासाठी आंशिक पेमेंट, ईएमआय इत्‍यादी सारख्‍या स्थिर पेमेंट पर्यायांची श्रेणी देण्‍यात आली आहे.

सर्व-समावेशक पॅकेजेस विविध बजेट आणि पसंतींसाठी पर्यायांची श्रेणी देतात, ज्यात बजेट-अनुकूल पर्याय, लक्झरी पॅकेजेस, साहसी पॅकेजेस आणि बरेच काही समाविष्ट आहे. देशांतर्गत गंतव्‍यांसाठी २४,९९९ रूपयांपासून आणि आंतरराष्ट्रीय हॉलिडेजसाठी ४४,९९९ रूपयांपासून सुरू होणारे हे पॅकेजेस जोडप्यांच्या गरजा आणि प्राधान्यांची पूर्तता करतात, त्यांना विनासायास व संस्मरणीय हनिमूनचा अनुभव मिळेल याची खात्री देतात.