पेटीएम यूपीआयचा वापर करून बस तिकीट आरक्षित करा आणि रु.300चा तत्काळ डिस्काउंट

Santosh sakpal April 19, 2023 04:56 PM

मुंबई : वन97 कम्युनिकेशन्स लिमिटेड (ओसीएल) यांच्या मालकीच्या असलेला पेटीएम ब्रँड हा भारतातील मोबाइल पेमेंट्स आणि क्यूआर कोडचा उद्गाता आहे. पेटीएम यूपीआयचा वापर करून पेटीम बस तिकिटांवर बस तिकिटांचे आरक्षण केल्यास त्यांच्यातर्फे रु.300 चा तत्काळ डिस्काउंट देण्यात येत आहे. या टेक इनोव्हेटरने बस तिकीट बुकिंग वाजवी खर्चात उपलब्ध करून दिले आहे, जेणेकरून युझर्स विनाअडथळा अधिक बचत करू शकतील.

भारतातील सर्वात इनोव्हेटिव्ह टेक कंपनीतर्फे तीन ऑफर देण्यात आल्या आहेत - NEW2BUS, BOGO आणि RIDE100 -- पेटीएम बस तिकिटे. या ऑफर्सचा वापर करून युझर्स पेटीएम यूपीआयने पेमेंट्स करून बचत करू शकतात. या माध्यमातून भारतभरातून कुठूनही युझर्स तिकिटे आरक्षित करू शकतात.

NEW2BUS ऑफरअंतर्गत युझर्सना रु.300 च्या किमान ऑर्डर मूल्याच्या बस तिकीट आरक्षणावर 10% किंवा रु.150 पर्यंत डिस्काउंट मिळेल. BOGO चा वापर करून युझर्सना पेटीएम यूपीआयचा वापर करून दुसरे तिकीट आरक्षण केल्यास 100% किंवा रु.300 पर्यंत तत्काळ डिस्काउंट मिळेल. RIDE100 ऑफर अंतर्गत युझर्सना बस तिकीट आरक्षण आणि पेटीएम यूपीआयने पेमेंट केल्यास रु.100 चा तत्काळ डिस्काउंट मिळेल.