भरत गोगावलेची निवड न्यायालयाकडून रद्द : विधानसभा अध्यक्षांकडून वैध

Santosh Gaikwad January 11, 2024 10:12 AM



मुंबई: शिवसेना शिंदे गटाने भरत गोगावले यांची केलेली नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवली होती. मात्र विधानसभा  अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गोगावले यांची मुख्य प्रताप पदी केलेली निवड वैद्य ठरवली आहे यामुळे गोगावले यांच्या सतत पदाचा वाद पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.


विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा निकाल देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना मूळ शिवसेना असल्याचा निवाडा दिला आहे. मुख्यमंत्री  शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या झालेल्या बैठकीत सुनील प्रभू यांना मुख्य प्रतोद पदावरून दूर करून भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली होती. प्रभू यांची नियुक्ती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती. शिंदे यांच्या या नियुक्तीला आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयाने भोगावले यांची नियुक्ती रद्द केली होती.

 निवडणूक आयोगाच्या निर्णयाची दखल न घेता मूळ पक्ष कोणाचा आणि विधिमंडळात पक्षाचे मुख्य प्रतोद कोण ? याबाबत स्वतंत्रपणे छाननी व अभ्यास करून निर्णय घेण्याच्या आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. नार्वेकर यांनी विधिमंडळ पक्षात शिंदे यांच्याकडे असलेले बहुमत निवडणूक आयोगाचा निर्णय आधी मुद्द्यावर विचार केला आहे. गोगवलेंची निवड न्यायालयाकडून रद्द ठरविल्यानंतर अध्यक्षांकडे वैध ठरविल्याने ठाकरे गटाकडून आक्षेप घेण्यात आला असून पुन्हा सर्वोच्च न्यायालयात या निर्णयाला आव्हान देण्याची तयारी सुरू केली आहे 
------