• प्रकल्प सक्षम हा आर्थिक साक्षरता उपक्रम आहे जो उपेक्षित स्त्रिया आणि मुलींना माहितीपूर्ण आर्थिक निर्णय घेण्यासाठी मूलभूत आर्थिक शिक्षण देण्याच्या उद्देशाने लक्ष्यीत करण्यात आला आहे.
• या प्रकल्पात उत्तर (दिल्ली NCR, उत्तर प्रदेश, राजस्थान), पश्चिम (महाराष्ट्र) आणि पूर्व भारत (बिहार, पश्चिम बंगाल) या सहा राज्यांमधील मुलींसह सुमारे 30,000 महिलांचा समावेश होता, ज्यांना 600 पेक्षा जास्त कार्यशाळांमध्ये प्रशिक्षण दिले गेले.
• आर्थिक साक्षरता कार्यशाळेच्या अभ्यासक्रमात अर्थसंकल्प, बचत, क्रेडिट योग्यता आणि गुंतवणूक नियोजन यासारख्या विषयांचा समावेश आहे.
नवी दिल्ली/ मुंबई, 30 मे 2023: होम क्रेडिट इंडिया (HCIN), जी एक अग्रगण्य जागतिक ग्राहक वित्त पुरवठादाराची स्थानिक शाखा आहे, त्यांनी अलीकडेच आपला आर्थिक साक्षरता CSR उपक्रम “सक्षम” पूर्ण केला, ज्यात अंमलबजावणी भागीदार, इंडियन डेव्हलपमेंट फाउंडेशन (IDF) जी एक खाजगी ना-नफा संस्था आहे, त्यांच्या सहकार्याने सुमारे 30,000 उपेक्षित महिला आणि मुलींना लाभार्थी म्हणून प्रशिक्षित केले गेले. प्रकल्प सक्षम हा जुलै 2022 ते मार्च 2023 पर्यंत 9 महिन्यांचा आर्थिक साक्षरता उपक्रम होता.
सक्षम आर्थिक साक्षरता प्रकल्पामागील मुख्य उद्देश हा उपेक्षित महिला आणि मुलींना मूलभूत आर्थिक शिक्षण देणे आणि त्यांना माहितीपूर्ण आर्थिक निर्णय घेण्यास सक्षम करणे हा आहे. देशाच्या उत्तर, पश्चिम आणि पूर्व भागात प्रामुख्याने आयोजित केलेल्या 605 आर्थिक साक्षरता कार्यशाळांमधून सक्षम प्रकल्पात सुमारे 30,000 महिलांना (ज्यात विद्यार्थिनी, गृहिणी, मोलकरीण आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या यांचा समावेश आहे) समाविष्ट केले गेले. प्रकल्प सक्षम मध्ये 15 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 30% विद्यार्थिनींचा समावेश असल्याने, 2020 पासून राबविण्यात आलेल्या NEP अंतर्गत आर्थिक साक्षरता कार्यक्रमांतर्गत येण्याचा लाभ मिळाला.
सक्षम प्रकल्पाच्या यशाबद्दल बोलताना, आशिष तिवारी, मुख्य विपणन अधिकारी, होम क्रेडिट इंडिया, म्हणाले, “भारतात आणि जागतिक स्तरावर, आर्थिक साक्षरता सामान्य साक्षरतेच्या खूप मागे आहे आणि महिलांमध्ये ती निराशाजनक पातळीवर आहे. होम क्रेडिट इंडियासाठी, आर्थिक साक्षरता हा प्रमुख ESG स्तंभांपैकी एक आहे आणि आम्ही समाजात ‘जबाबदार कर्ज घेण्याची संस्कृती’ वृद्धिंगत करण्यासाठी आर्थिक आणि डिजिटल साक्षरतेला चालना देऊन त्यावर काम करत आहोत. इंडियन डेव्हलपमेंट फाऊंडेशनच्या सहकार्याने सक्षम प्रकल्पाचा पहिला टप्पा यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल आम्हाला आनंद होत आहे आणि आपल्या समाजातील उपेक्षित महिलांना सक्षम आणि सबळ करण्याची ही फक्त सुरुवात आहे ज्यामुळे आत्मविश्वास निर्माण होईल आणि त्यांना त्यांचे वैयक्तिक आणि घरगुती आर्थिक निर्णय घेण्यास मदत होईल.”
एक जबाबदार ग्राहक कर्ज प्रदाता म्हणून, होम क्रेडिट इंडियाचा विश्वास आहे की वैयक्तिक वित्त व्यवस्थापित करण्यासाठी आणि माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी मूलभूत आर्थिक ज्ञान आणि कौशल्ये आवश्यक आहेत. आर्थिक साक्षरता कार्यशाळेसाठी सक्षम च्या अभ्यासक्रमात बजेटिंग, बचत, क्रेडिट योग्यता आणि गुंतवणूक नियोजन यांसारख्या विषयांचा समावेश आहे.
प्रकल्पाच्या अंमलबजावणीवर बोलताना, डॉ. नारायण अय्यर, सीईओ, IDF, म्हणाले, "आर्थिक साक्षरता ही काळाची गरज बनली आहे, विशेषत: सरकारने देशात आर्थिक समावेशकतेच्या तळागाळातील प्रवेशावर लक्ष केंद्रित केले आहे. उपेक्षित महिलांवर लक्ष केंद्रित करून, आम्ही समाजाच्या तळापासून आर्थिक शिक्षण सुरू केले आहे, जे व्यापक समाजात त्याची प्रासंगिकता पसरवण्यासाठी एक मजबूत पाया तयार करेल. आमच्या साक्षरता कार्यशाळांना उपस्थित लाभार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे, ज्यात अशा प्रकारच्या अधिक नियमित प्रशिक्षणासाठी आणि मोठ्या प्रभावासाठी कुटुंबातील पुरुषांना समाविष्ट करण्याची विनंती देखील करण्यात आली आहे. IDF अनेक दशकांपासून शिक्षण आणि कौशल्य विकासावर काम करत आहे आणि देशामध्ये आर्थिक साक्षरतेला चालना देण्यासाठी होम क्रेडिटच्या अनुनयाने, आमच्या सहकार्याने या उपक्रमाला आणखी पुढे नेण्यास तयार आहे"
RBI आणि इतर वित्तीय नियामकांनी प्रवर्तित केलेल्या नॅशनल सेंटर फॉर फायनान्शियल एज्युकेशन (NCFE) नुसार, भारताचा साक्षरता दर त्याच्या लोकसंख्येच्या जवळपास 80% आहे, तथापि, प्रौढ लोकसंख्येपैकी केवळ 27% आर्थिकदृष्ट्या साक्षर आहेत आणि महिलांमध्ये ही संख्या सुमारे 21% आहे.
आर्थिक साक्षरतेच्या उपक्रमांचा एक भाग म्हणून, होम क्रेडिट इंडियाने आपल्या इन-हाउस ‘पैसे की पाठशाला’ मायक्रोसाइट, ब्लॉग आणि सोशल मीडिया मोहिमांद्वारे 3 दशलक्षाहून अधिक लोकांशी संवाद साधला आहे.सर्वांसाठी आर्थिक समावेश आणि सुलभता वाढवण्यासाठी होम क्रेडिटने नेहमीच तंत्रज्ञान आणि डिजिटल इनोव्हेशनच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवला आहे.