कॅमॉन २० अवोकॅडो आर्ट Edition: डिझाईन, तंत्रज्ञान आणि किंमत या सर्वांमध्ये आघाडीवर असणारा स्मार्टफोन
Santosh Sakpal
August 31, 2023 04:44 PM
~कॅमॉन २० अवोकॅडो आर्ट Edition आता केवळ रु. १५९९९/- किंमतीत भारतीय बाजारपेठेत उपलब्ध
Mumbai, २९ ऑगस्ट,२०२३: कल्पकता आणि स्टाइल याचे जणू दुसरे नाव असलेला एक आघाडीचा टेक्नॉलॉजी ब्रॅंड टेक्नो (TECNO) सुंदर डिझाईन केलेल्या स्मार्टफोनच्या जगात आता पुन्हा एकदा नवीन पायंडा पाडत आहे. ब्रॅंडचे सर्वात नवीनतम उत्पादन कला आणि तंत्रज्ञान यांच्या सुंदर आणि एकजीवी मिश्रण असलेल्या मांडणीद्वारे स्मार्टफोनचा अनुभव अजून जास्त समृद्ध करण्यासाठी सज्ज आहे.
कॅमॉन २०च्या या विशेष आवृत्तीमध्ये नक्षीदार पोत, कलात्मक ग्रॅफिटी आणि उत्साहवर्धक मात्र आल्हाददायक अशा हिरव्या रंगात आकर्षक आणि उत्कृष्ट लेदर फिनिश यांचे सुंदर मिश्रण आहे. त्यामुळे हा एक असा स्मार्टफोन बनतो जो केवळ एक उपकरण न राहता एक स्टाइल स्टेटमेंट बनतो. जे एकसारखेपणाच्या या जगात आपला वेगळेपणा घेऊन उभा आहे आणि विशेष म्हणजे याची किंमत ग्राहकांसाठी यास अजून जास्त खास बनवते.
आकर्षक डिझाईन व्यतिरिक्त कॅमॉन २० अवोकॅडो आर्ट Edition अत्याधुनिक वैशिष्ठ्यांनी परिपूर्ण आहे. यामध्ये ६.६७ इंचाचा मोठा एफएचडी +डॉट- इन अॅमॉल्ड डिस्प्ले (large 6.67-inch FHD+ Dot-in AMOLED display), ३२ एमपी एआय सेल्फी कॅमेरा (32MP AI selfie camera), आरजीबीडब्ल्यू सेन्सरसह ६४ एमपी तिहेरी मागील बाजूचा कॅमेरा (64MP triple rear camera with RGBW sensor), ३३ वॅट चार्जिंग सपोर्ट सह ५००एमएएच बॅटरी (5000mAh battery with 33W charging support) आहे. हे मिडियाटेक हेलिओ जी ८५ प्रोसेसरद्वारे (MediaTek Helio G85 processor) देखील समर्थित आहे, जे सहज आणि कार्यक्षम कामगिरीची खात्री देते. मेमरी फ्यूजन आणि २५६ जीबी मोठ्या रॉमसह (256GB large ROM) अतिशय प्रभावी असे १६ जीबी रॅम (८जीबी +८जीबी) (16GB RAM-8GB+8GB) एवढी स्टोअरेज क्षमता आहे.
सौंदर्यात्मक दृष्ट्या अतिशय मनमोहक अश्या या कॅमॉन २० बाबत बोलताना टेक्नो मोबाइल (TECNO Mobile) चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अरिजीत तलपत्रा म्हणाले, “टेक्नोमध्ये आम्ही नेहमीच तरुण तंत्रज्ञान प्रेमींना आकर्षित करण्यासाठी कल्पकता आणि डिझाईनच्या सीमारेषा ओलांडण्याच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आम्ही सातत्याने करत असलेला पाठपुरावा व नावीन्यपूर्ण आणि कल्पक डिझाईनसाठी आमची कटिबद्धता यामुळे एक उत्कृष्ट तंत्रज्ञान ब्रॅंड म्हणून आमचे स्थान मजबूत झाले आहे. आमच्या प्रत्येक नवीन स्मार्टफोन मधून आम्ही एक अनोखी गाथा व्यक्त करतो, जी कला आणि तंत्रज्ञान या दोघांना सहज व एकसारखे एकत्र विणून एक संतुलित मिश्रण तयार करते, जे आमच्या वापरकर्त्यांना मनापासून भावते. आमच्या भागीदारींद्वारे आणि उत्कृष्ट रचना तयार करण्याच्या आमच्या समर्पणाद्वारे आम्ही एक नवीन ट्रेंड बाजारात आणत आहोत. तंत्रज्ञान आणि सौन्दर्यशास्त्र यांच्या अनोख्या एकत्रीकरणातून बनलेला हा ट्रेंड खास आकर्षक किंमतीत आम्ही सादर करत आहोत.”
कॅमॉन २० अवोकॅडो आर्ट Edition (The CAMON 20 Avocado Art Edition) खरोखरीच अतुलनीय असे ग्राहक अनुभव प्रदान करते. व्हिडिओ पाहण्यासाठी, गेम खेळण्यासाठी, किंवा इंटरनेटवर केवळ माहिती पाहत राहण्यासाठी (वेब ब्राऊझिंग) याचा मोठा आणि उत्साहवर्धक असा डिस्प्ले अगदी उत्तम आणि परिपूर्ण आहे. एआय सेल्फी कॅमेऱ्याने अगदी कमी प्रकाशात देखील सुंदर व शानदार असे फोटो आणि व्हिडिओ घेता येतात. जास्त काळ चालणारी बॅटरी म्हणजे बॅटरीची पॉवर जाण्याची चिंता न करता तुम्ही दिवसभर तुमचा फोन वापरू शकता.
मात्र, कॅमॉन २० अवोकॅडो आर्ट Edition (The CAMON 20 Avocado Art Edition) तील सर्वात चांगली गोष्ट कोणती असले तर त्याची किफायतशीर किंमत. बाजारातील सर्वात स्टायलिश आणि वैशिष्ठ्यपूर्ण स्मार्टफोन्सपैकी एक असलेल्या या कॅमॉन २० अवोकॅडो आर्ट अॅडिशन (The CAMON 20 Avocado Art Edition) ची किंमत रु. १५,९९९/- एवढी आहे. जर तुम्ही एखाद्या परिपूर्ण स्मार्टफोनच्या शोधात असाल तर कॅमॉन २० अवोकॅडो आर्ट Edition (The CAMON 20 Avocado Art Edition) हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे.
कॅमॉन २० अवोकॅडो आर्ट Edition (The CAMON 20 Avocado Art Edition) ची प्रमुख वैशिष्ठ्ये:
आकर्षक डिस्प्ले आणि डिझाईन: आकर्षक वैशिष्ट्यांसह स्मार्टफोनची मानके पुन्हा परिभाषित करणारा आणि उत्कृष्ट प्रतीचे फोटो टिपण्यासाठी एक अग्रगण्य स्मार्टफोन. इन्-डिस्प्ले फिंगर प्रिंट सेन्सरसह ६.६७ इंचाचा मोठा एफएचडी +डॉट- इन अॅमॉल्ड डिस्प्ले (large 6.67-inch FHD+ Dot-in AMOLED display) ने समर्थित असलेल्या या स्मार्टफोनचे अभिमानास्पद असे १०८०*२४०० रिझोल्यूशन आहे. हे स्क्रीन उच्च कार्यक्षमतेच्या पलिकडे जाऊन चैतन्यशील अशा रंगछटा आणि गुंतागुंतीच्या तपशीलांचे एक मार्ग खुले करते. टीयूव्ही राइनलँड प्रमाणित ब्ल्यू लाइट सुरक्षा (TUV Rheinland certified Blue Light protection) यामध्ये आहे, जे जास्त वेळ फोनचा वापर करताना डोळ्यांच्या आरोग्याची शाश्वत काळजी घेण्यासाठी या स्मार्टफोनची व्हिजुअल चमक संतुलित करते. उत्कृष्ट अशा लेदर फिनिशवर या उपकरणाची नक्षीदार व कलात्मक ग्रॅफिटी डिझाईन म्हणजे उपयोगिता आणि सौन्दर्य यांचे मिलनच झाले आहे. कॅमॉन २० मध्ये डयूएल मॅट्रिक्स कॅमेरा डिझाईनसह एक कल्पक रिंग फ्लॅश आहे, जो कलात्मकता आणि उपयुक्तता या दोनहीचे मूर्त स्वरूप आहे आणि ते फोटोग्राफीची मजा अजून वाढवते. रूप आणि कार्य यांना एकमेकांशी जोडणारा हा अनोखा दृष्टिकोन अशा वापरकर्त्यांसाठी आहे ज्यांना स्टाइल आणि वस्तूची गुणवत्ता या दोन्हीचे संतुलन हवे असते.
कॅमेऱ्याची अतुलनीय क्षमता: फोटोग्राफीच्या अनुभवला एक नवीन परिमाण देणाऱ्या जबरदस्त क्षमता असलेला कॅमेरा असणारा असा हा कॅमॉन २० स्मार्टफोन आहे. सामोरील बाजूस ८०.६ वहयू अॅंगल आणि डयूएल फ्लॅशलाइटच्या प्रणालीसह एक शक्तिशाली ३२ एमपी एआय सेल्फी कॅमेरा (32MP AI selfie camera) अतिशय उत्तम लायटिंगची आवश्यकता असणाऱ्या परिस्थितीमध्ये देखील उत्तम सेल्फ पोट्रेटची हमी देतो. आरजीबीडब्ल्यू सेन्सरसह ६४ एमपी तिहेरी मागील बाजूचा कॅमेऱ्याने (64MP triple rear camera with RGBW sensor) तर खरोखरीच चित्तथरारक फोटोग्राफी परिणाम मिळतील. नावीन्यपूर्ण अशी क्वॉड रिंग फ्लॅशलाइट कमी प्रकाशातील छायाचित्रांना एक वेगळ्याच उंचीवर नेते. जेथे प्रकाश परिस्थिती अत्यंत अवघड आहे अशा स्थितीमध्येसुद्धा आकर्षक फोटो टिपण्याची क्षमता या उपकरणात आहे. या वैशिष्ठ्यपूर्ण कॅमेऱ्याच्या ताकदीने कॅमॉन २० प्रत्येक क्षण त्यातील संपूर्ण सौन्दर्य आणि स्पष्टतेसह टिपण्यासाठी सज्ज आहे.
उपलब्धता: कॅमॉन २० हा स्मार्टफोन रु. १५,९९९ या अक्षरशः धुमाकुळ घालणाऱ्या किफायतशीर किमतीत उपलब्ध आहे आणि सोयीस्कर अशा इएमआय प्लॅनचा फायदा घेऊन तुम्ही तो केवळ ३० रुपये प्रति दिवस* या किमतीत तुमच्या जवळच्या रिटेल आउटलेटमध्ये आणि अॅमेझॉनवर विकत घेऊ शकता.
# # #