संस्थेचे खरे मालक तुम्हीच, आम्ही फक्त विश्वस्त ! : किरण ठाकूर यांचे प्रतिपादन
Santosh Gaikwad
April 15, 2024 05:48 PM
मुंबई : लोकमान्य टिळक नेहमी म्हणत की, आधी स्वराज्य मग सुधारणा, टिळकांना देश सुजलाम सुफलाम करायचा होता, ते ध्येय आम्ही बाळगत असून त्यातून लोकमान्य सोसायटीची पहिली शाखा टिळक वाडीत सुरू केली. तर १०० वी शाखा टिळक वाडयात सुरू केली. ही संस्था जनतेच्या मालकीची असून, तुम्ही सगळे मालक आहात. आम्ही फक्त विश्वस्त आहोत. असे प्रतिपादन लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीचे संस्थापक किरण ठाकूर यांनी केले.
मुंबई विभागाकडून एक हजार कोटी गुंतवणुकीचा टप्पा नुकताच पार केला या निमित्ताने बोरीवली येथे आयोजित केलेल्या कौतुक सोहळयात ते बोलत होते मुंबई विभागातील उपनगरातील बोरीवली पश्चिम, बोरिवली पूर्व चारकोप आणि वसई चार शाखांचा संयुक्तिक कार्यक्रम होता. यावेळी संस्थेच्या कार्याची माहिती सांगणारा माहिती पट दाखविण्यात आला व्यासपीठावर लोकमान्य संस्थेचे संस्थापक किरण ठाकूर रिजनल मॅनेजर रमेश शिरसाट असिस्टंट रिजनल मॅनेजर अतुल परब संचालक पंढरी ज्येष्ठ रंगकर्मी अभिनेते प्रभाकर सावंत (उर्फ गोटया) गायिका अर्चना कन्हेरे आदी मान्यवर उपस्थित होते.
लोकमान्य संस्थेने गुंतवणुकीचा एक हजार कोटींचा टप्पा गाठला त्याचे श्रेय सर्व सहकार्यांना असल्याचे सांगत संस्थापक किरण ठाकूर ठेवीदारांशी संवाद साधताना म्हणाले की, ठेवीदारांचा विश्वास महत्वाचा असून ठाकूर घराण्याने स्वातंत्रय पूर्व काळापासून आताच्या लोककल्प प्रकल्पापर्यंत धावता आढावा घेतला. टिळकांना देश सुजलाम सुफलाम करायचा होता ते ध्येय आम्ही पाळतो आहोत. ते पुढे म्हणाले की, देश महिला चालवत असून संस्थेत ७० महिलांना प्राधान्य दिल जात आहे महिलांनी उत्पाद्दीत केलेल्या वस्तुंना आंतरराष्ट्रीय मार्केट देण्यासाठी प्रयत्न सुरू असून याच वर्षी सुरूवात होईल असे ते म्हणाले. तसेच लोकमान्यकडून विविध सामाजिक आणि सेवाभावी संस्थांना ५० कोटी पेक्षा जास्त देणग्या दिल्या आहेत गेली २० वर्षे शिवजयंती साठी २५ लाखाची बक्षिसे दिली गेलीत तर गणेशोत्सवासाठी ५० लाखाची बक्षीस दिली जातात. टिळकांच्या शिकवणीप्रमाणे हिंदु एकवटण्यासाठी हे सुरू आहे. सहकारातून उपजीविका साधन निर्माण करत आहेात यात सहकार्य करण्याचे आवाहन ठाकूर यांनी केले.
ज्येष्ठ अभिनेते प्रभाकर सावंत यांनी सोसायटीचा सभासद होण्याची इच्छा व्यक्त केली सावंत म्हणाले की मी लोकमान्यशी निगडीत आहे मात्र येथील भरभराट ऐकून सोसायटीचा सभासद मी नक्की होणार असल्याचे सावंत म्हणाले.
लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीने एक हजार गुंतवणुकीचा टप्पा पार केल्याने ठेवीदारांना स्वरांचे चांदणे महफिलींचे आयोजन केले होते रसिकांसाठी ही संगीत पर्वणी ठरली यात इंडियन आयडॉल १२ चे विजेते गायक नचिकेत लेले आणि ५७ वा चित्रपट पुरस्कार विजेते गायक मधुरा कुंभार यांनी गाण्याची महफिल सादर केली. संचालक पंढरी परब यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.