मराठा आरक्षण जात प्रमाणपत्रासंदर्भात गठित न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीला २४ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ !

Santosh Gaikwad October 27, 2023 11:37 PM


 

 मुंबईदि. 27 : मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा-कुणबीकुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्‍याच्या प्रकियेमध्ये आवश्यक त्या अनिवार्य पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करण्याबाबत तसेच तपासणीअंती मराठा समाजास मराठा-कुणबीकुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपध्‍दती विहित करण्‍यासाठी न्‍यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्‍त) यांच्या अध्‍यक्षतेखाली गठित केलेल्या समितीस शाश्वत व आधारभूत कामकाज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 24 डिसेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहितीसामान्य प्रशासन विभागाचे (साविस) सचिव सुमंत भांगे यांनी दिली.


            मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा-कुणबीकुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक व अनिवार्य निजामकालिन पुरावेवंशावळीशैक्षणिक पुरावेमहसुली पुरावेनिजामकाळात झालेले करारनिजामकालिन संस्थानिकांना दिलेल्या सनदाराष्ट्रीय दस्तावेज इत्यादी पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करण्याबाबत तसेच तपासणीअंती पात्र व्यक्तींना मराठा-कुणबीकुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपध्दती विहित करण्‍याची जबाबदारी सोपविलेली आहे. 


या समितीचे अध्‍यक्ष न्‍यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्‍त) असून विभागीय आयुक्‍तछत्रपती संभाजीनगर हे या समितीचे सदस्‍य सचिव आहेत आणि अपर मुख्‍य सचिव (महसूल) व प्रधान सचिवविधी व न्‍याय विभागमंत्रालयमुंबई यांच्यासह मराठवाड्यातील आठ जिल्‍ह्यांचे जिल्‍हाधिकारी हे या समितीचे सदस्‍य आहेत.

समितीची पहिली बैठक दि. 11 सप्टेंबर 2023 रोजी मुंबईत झाली.


            या बैठकीमध्‍ये समितीच्‍या कार्यकक्षेबाबत सविस्‍तर चर्चा होऊन समितीच्‍या पुढील कामकाजाची दिशा ठरविण्‍यात आली. तसेच या पूर्वीच्‍या समितीने या विषयासंबंधाने निजामकालिन जुने महसुली अभिलेखे तपासण्‍यासाठी राज्‍य शासनाचे एक पथक हैदराबाद येथे अभिलेखांचा शोध व तपासाबाबत पाठविले होते. या पथकास निजामकालिन जुन्‍या अभिलेखातील सनदामूंतखबकरारजनगणनेचे अभिलेखे इत्‍यादी तपासण्‍याबाबत सूचना देण्‍यात आल्‍या होत्‍या. त्‍यानुसार महाराष्‍ट्र राज्‍याच्‍या जमाबंदी आयुक्‍तांच्‍या अध्‍यक्षतेखाली त्‍यांच्‍या कार्यालयातील काही अधिकारी व विभागीय आयुक्‍त कार्यालयछत्रपती संभाजीनगर कार्यालयातील अधिकारी यांच्‍या पथकाने हैदराबाद येथे भेट दिली. त्‍यांच्‍या सोबत मोडी लिपी व ऊर्दू भाषा जाणकार व्‍यक्‍तींचा समावेश करण्‍यात आला होता. या पथकाने दि. 14 सप्टेंबर 2023 रोजी हैदराबाद येथे भेट देऊन जुने निजामकालिन महसुली अभिलेखेजनगणना अभिलेखेअबकारी विभागाचे अभिलेखे व पुरातत्‍व विभागाकडील अभिलेखेमूंतखब इत्‍यादींची पाहणी केली व पथकाने उपलब्‍ध मूंतखब अभिलेख्‍यांच्‍या प्रती स्‍कॅन करुन सोबत आणल्‍या. याबाबतची माहिती समितीच्‍या पहिल्‍या बैठकीत देण्‍यात आली.


            न्‍यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्‍त) समितीची दुसरी बैठक 15 सप्टेंबर 2023 रोजी मुंबई येथे झाली. या बैठकीमध्‍ये मराठवाड्यातील जुने महसुली अभिलेखेजन्‍म-मृत्‍यू नोंदीचे अभिलेखे1967 पूर्वीचे शैक्षणिक अभिलेखेपोलिसांकडील गुन्‍हा नोंद रजिस्‍टरअबकारी विभागाकडील अभिलेखेवक्‍फ बोर्डाकडील अभिलेखेसैनिक कल्‍याण विभागाचे अभिलेखेकारागृह विभागाकडील नोंदी इत्‍यादींची तपासणी करण्‍याचे निश्चित करण्‍यात आले. तसेच यापूर्वी कुणबी जातीची दिलेली प्रमाणपत्रेनाकारलेले अर्जजात वैधता पडताळणी समितीकडून वैध ठरविण्‍यात आलेली प्रकरणेअवैध ठरविलेली प्रकरणे व अवैध ठरविण्‍याचे कारण याबाबत जिल्‍हानिहाय तपासणी करुन जिल्हाधिकारी यांनी अहवाल सादर करण्‍याचे बैठकीत निर्देश देण्‍यात आले.