पिंपळगाव तर्फे नारायणगाव येथे ‘मराठी बाणा’ थाटात संपन्न

Santosh Gaikwad July 03, 2023 10:48 AM


पुणे : उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव आध्यात्मिक वारसा लाभलेले पिंपळगाव तर्फे नारायणगाव मध्ये १८९ वर्षे जुने असलेले श्रीराम मंदिराच्या जीर्णोद्धारानिमित्त या गावचे ग्रामस्थ व मुंबईकर यांनी नवी मुंबई येथील विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी येथे कौटुंबिक स्नेहसंमेलन व सुप्रसिद्ध कलाकार दिग्दर्शक, जुन्नर तालुक्याचे सुपुत्र शिवनेरी भूषण अशोक हांडे यांचा  चौरंगनिर्मित मराठी बाणा हा मराठी संस्कृतीवरील सांस्कृतिक कार्यक्रम नुकताच पार पडला. कार्यक्रमाच्या निमित्ताने पिंपळगाव ग्रामस्थ मुंबईकर आणि नातेवाईक मित्रमंडळी आप्तेष्ट सगेसोयरे आणि जुन्नर तालुक्यातील मान्यवरांनी हजेरी लावुन या कार्यक्रमाची शोभा वाढवली. 

कार्यक्रमाच्या माध्यमातून लाखो रुपयांच्या देणग्या या मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामासाठी जाहीर झाल्या. नवी मुंबईतील व्यापार, उद्योग आणि बँकिंग जगतातील  शंकरशेठ पिंगळे, भाऊसाहेब शिंगाडे, दशरथशेठ शिंगाडे, नितीन बनकर, संतोष दादा चव्हाण,  सुनील चव्हाण, विजय वाळुंज, प्रकाश मोरे, अण्णाभाऊ भोर, तुषार पालकर, अनिल जाधव, तुषार माळी, रोहिदास मुंढे, शशिकांत अभंग, पि बी बंडगर,  कपिलभाई भेदा, सतीश कोकने, प्रशांत भांगरे आणि पुरुषोत्तम दळवी, अनेक मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. 

सर्व मान्यवरांचे स्वागत आणि सन्मान श्रीराम मंदिर स्थानचे अध्यक्ष सुरेशशेठ वऱ्हाडी यांनी केले. अशोक हांडे यांचा सत्कार सुरेशशेठ वऱ्हाडी, अशोक खांडगे, वसंत वऱ्हाडी, प्रदीपजी चव्हाण, आणि सत्यवान वाणी यांनी केला.

कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन मुंबई स्थित पिंपळगावचे सुपुत्र वृंदावन वाणी चंद्रकांतशेठ वऱ्हाडी वसंत वऱ्हाडी, प्रदीप चव्हाण,  सचिन चव्हाण  अंकुश चव्हाण, अजित देवकर, बाळासाहेब वऱ्हाडी, सुनील खांडगे,  सत्यवान वाणी, दत्ता वऱ्हाडी, संतोष खांडगे, हनुमंत खांडगे, राहुल खांडगे, श्री श्याम वाणी,  उमेश वाणी, पद्माकर चव्हाण,  अनिकेत वाणी यांनी विशेष मेहनत घेतली. समलोचन कु. मोनिका कर्पे यांनी केले. 

या कार्यक्रमासाठी पिंपळगाव वरून मोठ्या संख्येने ग्रामस्थ राजेश गावडे पाटील, सुरेश वाणी, रमेश खांडगे, निलेश चव्हाण, राकेश चव्हाण आणि रमेश खांडगे आणि श्रीराम मंदिर संस्थानचे  अशोक दादा खांडगे, गणेश चव्हाण, अविनाश वऱ्हाडी, मधुसुदन देवकर,शशिकांत बेलेकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.