'लंडन'च्या रेड कार्पेटवर ‘मोऱ्या’ उर्फ जितेंद्र बर्डेचे भव्य स्वागत! ८ डिसेंबर २०२३ ला मोऱ्या महाराष्ट्रात!
Santosh Sakpal
November 18, 2023 09:12 PM
मुंबई : लंडन येथील "सोहोवाला सिनेमा म्हणजेच 'कोर्ट हाऊस हॉटेल सिनेमा'("Sohowala Cinema, Courthouse Hotel Cinema, London - UK ”) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या लंडनच्या आयकॉनिक सिनेमा हॉलमध्ये "मोरया"(MORRYA) या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एका मराठी चित्रपटाचा 'भव्य प्रीमियर शो' करण्यात आला आहे. UK मधील महाराष्ट्रीय समुदायाने आयोजित केलेल्या या चित्रपटाच्या ‘प्रीमियर शो’ची तिकिटे हातोहात संपली, ही आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे असे आयोजकांच्या वतीने लंडन स्थित "युनिक एअरएक्सप्रेस कुरिअरचे संचालक सिनेरसिक सचिन पाटील, कुलदीप शेखवात, तुषार जोगी, संतोष पारकर(बीजेपी), आबेडकरी विचाराचे प्रवीण करुणा यांनी व्यक्त केले आहे. या खास प्रीमियरसाठी मोऱ्या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक व प्रमुख अभिनेते जितेंद्र बर्डे हे खास उपस्थित होते.
आपल्या मराठी चित्रपट, नाटक, संगीत कलाकृतींचे लाखो चाहते जगभरात आहेत. अश्या कलाकृती पाहण्यासाठी ते आतुर असतात. विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये 'मोऱ्या' या मराठी चित्रपटाने लक्ष वेधले होते. त्यामुळे लंडन मधील रसिकांना हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता होती. UK मधील प्रीमियर शो पाहिल्यावर प्रेक्षक काही वेळ स्तब्ध होतो. चित्रपटाची कथा, मांडणी व सादरीकरण पाहून त्यांना गहिवरून आले होते. चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक, अभिनेते जितेंद्र बर्डे यांच्या कामाचे सर्वांनी तोंडभरून कौतुक केले. 'मोऱ्या' चित्रपटातील व्यक्तिरेखा मनात अस्वस्थता, चलबिचल, काहूर निर्माण करते अशी प्रतिक्रियासर्वच प्रेक्षकांनी बोलून दाखविली. या चित्रपटाचे शोज् संपूर्ण युरोप देशामध्ये करण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली.
एका सफाई कर्मचाऱ्यांची भावस्पर्शी कथा 'मोऱ्या' या चित्रपटात रेखाटण्यात आली असून ती साकारण्यासाठी अभिनेता जितेंद्र बर्डे यांनी विशेष मेहनत घेतली आहे. त्यांचा नैसर्गिक सहज - संयमी अभिनय रसिकांच्या मनात घर करीत असून रसिकांसोबत त्यांची नाळ जोडली जात आहे. खास या शोसाठी उपस्थित असलेले जितेंद्र बर्डे हा सर्व अनुभव पाहून भारावून गेले होते. ते म्हणाले, "आपण जन्माला घातलेल्या कलाकृतीला प्रेक्षक आपलं म्हणतात, आणि तो विचार, ती कलाकृती स्वतः सोबत घेऊन जातात, हा विलक्षण अनुभव मी इथे अनुभवाला आहे. माझा हा पहिला चित्रपट आहे, त्यासाठी मी आणि माझ्या टीमने केलेले सर्व कष्ट सार्थकी लागले आहेत, विशेष म्हणजे धुळे जिल्ह्यातील 'पिंपळनेर ते लंडन' हा माझा प्रवासही 'मोऱ्या'मुळेच घडला आहे"
'मोऱ्या'चा टीझर ‘कान महोत्सवात दाखवण्यात आला होता. एलएचआयएफएफ बार्सिलोना आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, खजुराहो आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सव, झारखंड आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सव-२०२२, पेनझान्स आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सव, अयोध्या फिल्म फेस्टिव्हल, लेक सिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, बॉलिवूड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल या चित्रपट महोत्सवांत या सिनेमाला ‘उत्कृष्ट चित्रपटा’चा बहुमान मिळाला आहे. तसंच यापैकी काही महोत्सवांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट बालकलाकार, सर्वोत्कृष्ट कथा असे पुरस्कारही या सिनेमानं पटकावले आहेत. जितेंद्र बर्डेची ही पहिलीच कलाकृती आहे. या निर्मितीसाठी निर्माती तृप्ती कुलकर्णी, राजेश अहिवले, सहनिर्माते प्रेरणा धजेकर, पूनम नागपूरकर, मंदार मांडके, राहुल रोकडे, सचिन पाटील यांची खंबीर साथ लाभली आहे.
'टॉर्टुगा मोशन पिक्चर्स' निर्मित 'मोऱ्या'मध्ये उमेश जगताप, संजय भदाणे, धनश्री पाटील, राहुल रोकडे, सुरज अहिवळे, रुद्रम बर्डे, कुणाल पुणेकर, शिवाजी गायकवाड, दीपक जाधव, विजय चौधरी, अविनाश पोळ, रुपाली गायके आणि जितेंद्र पुंडलिक बर्डे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात उमेश जगताप, संजय भदाणे, धनश्री पाटील, रुद्रम बर्डे, कुणाल पुणेकर आणि शीर्षक भूमिकेत जितेंद्र बर्डे यांनी काम केले आहे. सफाई कामगार ते पिंपळनेरचा सरपंच हा 'मोऱ्या' उर्फ सीताराम जेधेचा थक्क करणारा जीवनप्रवास नेमका आहे तरी कसा हे दाखविण्यासाठी येत्या ८ डिसेंबर २०२३ ला मोऱ्या महाराष्ट्रातील आपल्या जवळच्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
@ https://instagram.com/tortuga_motionpictures?igshid=MXZ1YXZ6eDZhZm0xbg==
@ https://www.facebook.com/profile.php?id=61552202434806&mibextid=2JQ9oc
@https://www.facebook.com/jitendra.barde
@ https://twitter.com/TortugaMotion?s=08