52, Municipal Ind. Estate,
Dainik Shivner Marg,
Worli, Mumbai - 400018 (India)
लेखक जगदीश ओहोळ यांनी लिहिलेले 'जग बदलणारा बापमाणूस' या पुस्तकाच्या फक्त दीडशे दिवसांमध्ये 13 आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. या बेस्ट सेलर प्रेरणादायी पुस्तकाच्या दहाव्या आवृत्तीचे प्रकाशन अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात डॉ. सुरज एंगडे यांच्या हस्ते करण्यात आले आहे, तर पुढील तेराव्या आवृत्तीचे प्रकाशन आज शुक्रवारी मुंबईत खासदार वर्षा गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी काँग्रेस नेते सचिन सावंत, काँग्रेस प्रवक्ते युवराज मोहिते, सुरेशचंद्र राजहंस, लेखक जगदीश ओहोळ यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.