~ ५ राज्यांमधील शेतकरी समुदायांना शिक्षित करण्यासाठी खरीप हंगामाच्या शुभारंभासह जागरूकता उपक्रमांची सुरूवात ~
मुंबई,: एसबीआय जनरल या भारतातील आघाडीच्या जनरल इन्शुरन्स कंपनीने आगामी खरीप हंगामासाठी ५व्या ‘क्रॉप इन्शुरन्स वीक’ (पीक विमा सप्ताह) जागरूकता मोहिम सुरू केली आहे. कंपनी आझादी का अमृत महोत्सवच्या पाठबळासह शेतकरी समुदायासाठी बैठका, कार्यशाळा व प्रशिक्षण उपक्रम असे विविध उपक्रमांचे आयोजन करेल. या उपक्रमांच्या माध्यमातून पीएमएफबीवाय योजना, तसेच या योजनेचे फायदे व प्रमुख वैशिष्ट्ये याबाबत जागरूकतेचा प्रसार करण्यात येईल. या उपक्रमाचा शेतकऱ्यांची नोंदणी वाढवण्याचा, तसेच पीएमएफबीवाय योजनेअंतर्गत प्रवेश वाढवण्याचा मनसुबा आहे.
या जागरूकता मोहिमेचा भाग म्हणून एसबीआय जनरल महाराष्ट्र, मध्यप्रदेश, कर्नाटक, ओडिशा आणि आसाम या राज्यांमध्ये हे उपक्रम राबवणार आहे. प्रत्येक नियुक्त राज्यामधील मान्यवरांच्या उपस्थिती जागरूकता सप्ताह सुरू करण्यात येईल व हिरवा झेंडा दाखवण्यात येईल.
एसबीआय जनरल इन्शुरन्स पीएमएफबीवाय स्किममध्ये सहभाग घेत आहे आणि देशातील १६ राज्यांमध्ये या योजनेची अंमलबजावणी करण्याचा व्यापक अनुभव आहे. वर्षानुवर्षे कंपनीने शेतकऱ्यांसाठी ७,८१६ कोटी रूपयांचे क्लेम्स पूर्ण केले आहेत.
एसबीआय जनरल इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. किशोर कुमार पोलूडसू म्हणाले, ‘‘हवामान बदलामुळे शेतीला मोठा धोका निर्माण झाला आहे, ज्यामुळे शेतकरी असुरक्षित आहेत. प्रधानमंत्री फसल विमा योजना (पीएमएफबीवाय) हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे, जो कृषी क्षेत्रातील हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या आव्हानांचे निराकरण करतो. या योजनेत सहभागी होऊन शेतकरी हवामान बदलाशी संबंधित जोखीम कमी करू शकतात आणि शाश्वत शेती पद्धतींवर लक्ष केंद्रित करू शकतात. एसबीआय जनरल इन्शुरन्समध्ये आम्ही आमच्या प्रक्रियांमध्ये सतत सुधारणा करत आणि तंत्रज्ञान-आधारित सोल्यूशन्स सादर करत शेतकरी समुदायाला पाठिंबा व संरक्षण देण्यास सुसज्ज आहोत. ज्यामुळे शेतकऱ्यांना सुलभपणे सुविधा उपलब्ध होण्यास जलद प्रतिसाद देता येतो. आम्ही शेतकऱ्यांना अनिश्चिततेपासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी आणि हवामानामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांचा सामना करत शेती सुरू ठेवण्याच्या खात्रीसाठी पीएमएफबीवाय योजनेमध्ये नोंदणी करण्याचे आवाहन करतो.’’