राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी देणा-या तरविंदरसिंह मारवा व भाजपाविरोधात काँग्रेसचे शुक्रवारी राज्यभर आंदोलन

Santosh Gaikwad September 12, 2024 07:55 PM


मुंबई : लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. देशविघातक शक्तींनी महात्मा गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचे बळी घेतले आहेत.आता पुन्हा गांधी संपवण्याची जाहीर धमकी दिली जात आहे व भाजपाचे सरकार मात्र त्यावर काहीही कारवाई करत नाही हे अत्यंत गंभीर व आक्षेपार्ह आहे. राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देणारा भाजप नेता तरविंदरसिंह मारवा आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधात उद्या शुक्रवार दि. 13 सप्टेंबर रोजी काँग्रेस पक्ष राज्यभर तीव्र आंदोलन करून भाजपा सरकारचा धिक्कार करणार आहे.


खासदार राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या भाजपाचा माजी आमदार तरविंदरसिंह मारवा व भारतीय जनता पक्षाच्या विरोधात राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयी उद्या सकाळी ११ वाजेपासून तीव्र आंदोलन करुन या विकृत्तीविरोधात निषेध नोंदवाला जाणार आहे. भाजपाचा माजी आमदार तरविंदर सिंह मारवाच्या अटकेची मागणीही केली जाणार आहे अशी माहिती प्रदेश उपाध्यक्ष, संघटन व प्रशासन नाना गावंडे यांनी दिली आहे.