52, Municipal Ind. Estate,
Dainik Shivner Marg,
Worli, Mumbai - 400018 (India)
बाॅलीवूडमधील सर्वश्रेष्ठ संगीतकार राहुल देव बर्मन अर्थात पंचमदा यांच्या ८४व्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी संगीतबद्ध केलेल्या सदाबहार गीतांवर आधारित "यादे पंचम की" हा कार्यक्रम येत्या मंगळवारी २७ जून रोजी सायंकाळी ६ वाजता ठाणे कोपरी येथील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा कट्टा येथे आयोजित केला आहे.
गुलमोहर म्युझिकल ग्रुप तर्फे अनिल जाधव व अरुण खरात यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात पंचमदा यांनी संगीतबद्ध केलेली विविध गीते कराओके वर सादर केली जाणार आहेत. तरी रसिकांनी याचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.