काँग्रेस पक्षाचा १३८ वा स्थापना दिन: नागपुरातून परिवर्तनाचा नारा !
Santosh Gaikwad
December 28, 2023 01:35 PM
मुंबई : काँग्रेस पक्षाचा १३८ व्या वर्धापन दिन सोहळा आज ऐतिहासीक नागपूरमध्ये होत आहे.देशभरातील काँग्रेसचे प्रमुख नेते नागपुरात दाखल झाले आहेत.सर्व राज्यांचे मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे,सोनिया गांधी,राहुल गांधी,प्रियंका गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा होणार असून, नागपुरच्या पवित्र भूमितून परिवर्तानाचा संदेश दिला जाणार आहे
२८ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता स्थापना दिनाचा कार्यक्रम होणार आहे नागपूरच्या भूमीत रॅली निघणार आहे त्यामुळे या रॅलीला वेगळे महत्व प्राप्त झाले आहे या रॅलीत लाखो काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.काँग्रेस पक्षाच्या १३८ व्या वर्धापन दिनाच्या भव्य सोहळा नागपूरच्या भारत जोडो मैदानात होत आहे या स्थापना रॅलीला है तयार हम ही टॅगलाइन देण्यात आली आहे लोकशाही बचाव संविधान बचाव हा संदेश या रॅलीमधून देण्यात येणार आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले की, आज महागाई, शेतकरी, कामगार, तरुणांचे प्रश्न गंभीर झाले आहेत. सरकारी यंत्रणा वेठीस धरल्या आहेत. सरकारच्या विरोधात आवाज काढणाऱ्यांना शिक्षा केली जात आहे. देश कठीण प्रसंगातून जात आहे त्याला वाचवण्यासाठी काँग्रेसची ही लढाई असून देशाला वाचवणे हीच काँग्रेसची गॅरंटी आहे. परिवर्तनाचा एल्गार या महामेळाव्यातून पुकारला जाणार आहे, या परिवर्तनासाठी ‘हम तैयार है’ असे पटोले म्हणाले.
****