360 वन वेल्थ अखिल भारतीय ग्रां प्री बुद्धिबळ सीरिज-संजीव मिश्रा एकटा आघाडीवर
Santosh Sakpal
February 11, 2024 11:19 PM
मुंबई, 11 फेब्रुवारी: इंडियन चेस स्कूल आयोजित 360 वन वेल्थ तिसर्या अखिल भारतीय ग्रां प्री बुद्धिबळ सीरिजमध्ये सातव्या सीडेड संजीव मिश्राने अर्णव कोळी याचा पराभव करून सलग सहाव्या विजयासह सहाव्या फेरीअखेर 6 गुणांसह अव्वल स्थान पटकावले. सध्या जेतेपदासाठी तो प्रबळ दावेदार आहे.
अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ आणि महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशन यांच्या मान्यतेने सरू असलेल्या स्पर्धेत शनिवारी टॉपला असलेल्या संजीव आणि अर्णव यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. मिश्राने लंडन सिस्टिमचा अवलंब केला. त्याची चाल धोरणात्मक असूनही युवा खेळाडू अर्णवने त्याला तोडीसतोड प्रत्युत्तर दिले. डावाच्या मध्यावरही संजीवचे पारडे जड होते. तथापि, 26व्या चालीतील गंभीर चूक त्याला भोवली. त्याचा फायदा उठवत अर्णवने 37 च्या चालीमध्ये विजयावर शिक्कामोर्तब केले.
संजीव मिश्राच्या पाठोपाठ अव्वल मानांकित आंतरराष्ट्रीय मास्टर विक्रमादित्य कुलकर्णीने सहाव्या मानांकित अर्णव खर्डेकरचा पराभव करून सलग चौथा विजय मिळवला. कुलकर्णीच्या विजयामुळे शेवटच्या फेरीत संजीव मिश्रासमोर कडवे आव्हान आहे. शेवटच्या फेरीत संजीव कुलकर्णी हा संजीवची विजयी मालिका खंडित करण्याचा प्रयत्न करेल. दुसरीकडे, विजेतेपद मिळवण्यासाठी संजीवला फक्त ड्रॉ आवश्यक आहे.
विक्रमादित्य कुलकर्णीच्या खालोखाल अमरदीप बारटक्के, अर्णव कोळी, यश कापडी, सोहम पवार, दीपक सोनी आणि ध्रुव मुठे हे सहा खेळाडू दुसर्या स्थानी असून त्यांनाही जेतेपदासाठी संधी आहे.
- 360 वन वेल्थ अखिल भारतीय ग्रां प्री बुद्धिबळ सीरिज स्पर्धेत 2.5 लाखांची एकूण बक्षीसे ठेवण्यात आली बक्षीस रक्कम रेटिंग स्पर्धा आयोजित केली जात आहे.
सहाव्या फेरीचे प्रमुख निकाल:
संजीव मिश्रा (6 गुण) विजयी वि. अर्णव कोळी (5 गुण)
विक्रमादित्य कुलकर्णी व्ही (5.5) विजयी वि. अर्णव खेर्डेकर (4.5)
पुनीत दोधिया (4) पराभूत वि. अमरदीप बारटक्के (5)
कापडी यश (5) विजयी वि. मिरांका त्रिशद (4)
सोनी दीपक (5) विजयी वि. विवेक अय्यर (4)
जैन भार्गव (4) पराभूत वि. सोहम पवार (5)
सुनील वैद्य (4) पराभूत वि. ध्रुव मुठे (5)
श्रावण बलराम (4) पराभूत वि. राघव श्रीवास्तव (4.5)
रेयांश व्यंकट (4.5) विजयी वि. (3.5) अभिजीत जोगळेकर
कुश अग्रवाल (4.5) विजयी वि. श्रावण अग्रवाल (3.5)
मुकुल राणे (3.5) पराभूत वि. ईशान तेंडोलकर (4.5)
अर्णव थत्ते (4.5) विजयी वि. तन्मय मोरे (3.5)
विहान राव (4) ड्रॉ वि. देवेश आंब्रे (4)