थ्रीएस सुविधा पंचपाखडी भागात कार्यरत, या सेंटरद्वारे शहर व आजूबाजूच्या परिसरातील ग्राहकांना विक्री आणि विक्रीपश्चात सेवा देणार

Santosh Sakpal May 20, 2023 11:52 PM

टॉर्क मोटर्सतर्फे महाराष्ट्रात विस्तार, ठाण्यात नवा एक्सपिरीयन्स झोन सुरू

ठाणे,  – भारतातील पहिली इलेक्ट्रिक मोटरसायकल उत्पादक टॉर्क मोटर्सने ठाणे येथे आपले पहिले एक्सपिरीयन्स झोन सुरू केले आहे. मारीगोल्ड बिल्डींग, नितीन कंपनी, पंचपखाडी परिसर येथे वसलेले हे थ्रीएस सेंटर या भागातील ग्राहकांना विक्री आणि विक्रीपश्चात सेवा देईल. हे कंपनीचे महाराष्ट्रातील दुसरे सेंटर आहे. यापूर्वी पुण्यातील लॉ कॉलेज रस्ता येथे कंपनीच्या मालकीचे व कंपनीतर्फे चालवले जाणारे एक्सपिरीयन्स सेंटर कार्यरत आहे.

नव्या एक्सपिरीयन्स झोनमध्ये टॉर्क मोटर्सने नुकत्याच लाँच केलेल्या क्राटोस-आर मोटरसायकल शोरूममध्ये पाहायला मिळतील. इथे विक्रीपश्चात सेवांसाठी स्वतंत्र विभाग देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे भावी ग्राहकांसाठीही इथे वेगळी सोय आहे.

उद्घाटनप्रसंगी टॉर्क मोटर्सचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कपिल शेळके म्हणाले, ‘ठाण्यात सुरू केलेल्या नव्या एक्सपिरीयन्स झोनच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचताना आम्हाला आनंद होत आहे. या सेंटरच्या माध्यमातून ग्राहकांना आमच्या उच्च कामगिरी करणाऱ्या इलेक्ट्रिक मोटरसायकल्स जवळून पाहाता येतील. वाहतुकीचे पर्यावरणपूरक साधन वापरण्याची इच्छा असलेल्या ग्राहकांना टॉर्क क्राटोस उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. देशभरातील नेटवर्क विस्तारण्यावर आमचा भर आहे. महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये टॉर्क एक्सपिरीयन्स झोन सुरू करण्याची कंपनीची योजना आहे.’

टॉर्क मोटर्सने २०२२ मध्ये क्राटोस- आर ही प्रमुख मोटरसायकल लाँच केली. लाँच केल्यापासून कंपनीला त्यांच्या देशांतर्गत तयार करण्यात आलेल्या इलेक्ट्रिक मोटरसायकल्सच्या बुकिंगसाठी भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. यावर्षी दिल्ली ऑटो एक्स्पोमध्ये ब्रँडने नव्या, लक्षणीय बदलांसह क्राटोस आर सादर केली. मोटरसायकलमध्ये आता पूर्णपणे काळी मोटर व बॅटरी पॅक, स्टायलिश डिकॅलसह देण्यात आला आहे. त्याशिवाय वेगवान चार्जिंग करणारे पोर्टही यामध्ये आहे. ही मोटरसायकल ग्राहकांना पाच ट्रेंडी रंगांत उपलब्ध होणार असून त्यामध्ये जेट ब्लॅक आणि व्हाइट ह्यू यांचा समावेश आहे. गाडीचे ईएमआय प्रती महिना २९९९ रुपयांपासून सुरू होते. क्राटोस- आर सर्वांसाठी उपलब्ध करण्याच्या हेतूने टॉर्क मोटर्सने विविध वित्त कंपन्यांशी करार केला आहे.

सध्याच्या ग्राहकांनाही फरकाची रक्कम भरून आपली मोटरसायकल अद्ययावत करता येईल. ग्राहकांना कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर क्राटोस आर बुक करता येईल. www.booking.torkmotors.com