एनएमआयएमएस नवी मुंबई कॅम्पसच्या लवकरच विस्तार
SANTOSH SAKPAL
April 23, 2023 05:19 PM
५,००० विद्यार्थ्यांना सामावून घेण्याची क्षमता असलेला प्रकल्प लवकरच
नवी मुंबई / खारघर , २३ एप्रिल , २०२३ - एसव्हीकेएमच्या एनएमआयएमएस स्कूल ऑफ बिझनेस मॅनेजमेंट नवी मुंबई कॅम्पस मध्ये नुकताच ५ वा दीक्षांत समारंभ आयोजित करण्यात आला, यावेळी उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात आले. दरम्यान वाढत्या विद्यार्थी संख्येला सामावून घेण्यासाठी, एनएमआयएमएस नवी मुंबई या वर्षाच्या अखेरीपर्यंत आपली क्षमता दुप्पट करणार असून यामुळे आता हे कॅम्पस १:१५ शिक्षक-विद्यार्थी रेशो प्रमाने जवळपास ५० हजार विद्यार्थ्यांना सामावून घेण्यास सक्षम बनेल आगी माहिती एव्हीकेएमच्या एनएमआयएमएसचे प्रो व्हाईस चांसलर डॉ. शरद म्हैसकर यांनी दिली.
या वेळी विवेक अरोरा (कॉर्पोरेट एसव्हीपी आणि ग्लोबल हेड सदरलँड ग्लोबल सर्व्हिसेस) या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. याचबरोबर डॉ. रुचिता वर्मा, (आय/सी डायरेक्टर, नवी मुंबई, एनएमआयएमएस) डॉ. जयंत पी. गांधी, (जे.टी. सेक्रेटरी एसव्हीकेएम आणि एसव्हीकेएमच्या एनएमआयएमएस चे नामनिर्देशित कुलपती), आणि आशिष आपटे ( परीक्षा नियंत्रक आणि एसव्हीकेएमच्या एनएमआयएमएस चे नामनिर्देशित सदस्य) तसेच अन्य कर्मचारी, इतर सदस्य आणि बहुसंख्य विद्यार्थी यावेळी उपस्थीत होते.
यावेळी डॉ. शरद म्हैसकर म्हणाले की " एनएमआयएमएस ने तुम्हाला दिलेला ज्ञानाचा वारसा आणि तुम्ही घेतलेली मेहनत तुम्हाला यशस्वी होण्यास मदत करेल. काळाच्या रेती मध्ये आपल्या पाउल खुनांचे ठसे उमटवुन या आठवणी कायम ठेवा.