खरं आयुष्य तर हे मुल जगत आहे; ६ वर्षाच्या मुलानं बनवलं टाईमटेबल! अभ्यासासाठी अवघे १५ मिनिटे

Santosh Sakpal June 28, 2023 05:47 PM

VIRAL NEWS : बालपण हे मज्जामस्ती करण्याचे वय असते. या वयात कोणत्याही कामाची आणि जबाबदाऱ्यांची चिंता नसते. बालपणी अनेकांना स्वत:ला हवे तसे जगण्याचे एक स्वातंत्र्य असते. अर्थात गृहपाठ आणि आईचा मार मिळण्याचे दडपण असते पण तो आयुष्यातील एक खूप उत्तम काळ असतो. यात शिस्तीसाठी पालकांकडून प्रत्येक गोष्टीसाठी एक टाईमटेबल ठरवून दिलेले असते. त्यामुळे मुलांना टाईम टेबल पाळण्याची सवय अगदी लहानवयापासूनच लागते. या टाईम टेबलमध्ये अभ्यासासाठी अधिक वेळ आणि इतर कामांसाठी कमी वेळ ठरवून दिलेला असतो. पण एका सहा वर्षीय मुलाने स्वत: एक टाईमटेबल बनवले आहे. जे अगदी उलट आहे. ज्यात खेळण्यासाठी आणि इतर गोष्टींसाठी खूप वेळ देण्यात आला आहे पण अभ्यासासाठी फक्त १५ मिनिटे देण्यात आली आहेत, ते पाहून अनेकांना हसू आवरणे कठीण झाले आहे.
एका सहा वर्षीय चिमुकल्याने सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत काय-काय करायचे याचे यासाठी एक टाईमटेबल तयार केले आहे, जे आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. जे वाचून तुम्हीही पोट धरून हसाल. यावर काही लोकांनी, खरं आयुष्य तर हे मुल जगत आहे, अशी मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे. तर काहींनी अभ्यासासाठी १५ मिनिटे आणि आंघोळ करण्यासाठी ३० मिनिटे… व्वा! काय अभ्यास सुरु आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

https://twitter.com/Laiiiibaaaa/status/1671924881275994132?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1671924881275994132%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Ftrending%2F6-year-old-child-made-his-own-time-table-goes-viral-user-will-not-stop-laughing-sjr-98-3745744%2F

 

 

व्हायरल होणाऱ्या टाईमटेबलमध्ये तुम्ही पाहू शकता, चिमुकल्याने अभ्यासासाठी फक्त १५ मिनिटांचा वेळ दिला आहे. तर खेळण्यासाठी १ तास, फायटिंगसाठी ३ तास, दुपारी झोपण्यासाठी २ तास १५ मिनिटे आणि पुन्हा खेळण्यासाठी २ तास १५ मिनिटे अशा वेळा ठरवल्या आहेत.
@Laiiiibaaa नावाच्या ट्विटर युजरने २२ जून रोजी ही पोस्ट शेअर केली आहे. जी आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, हे टाईमटेबल माझ्या ६ वर्षाच्या चुलत भावाने बनवले आहे… अभ्यासासाठी फक्त १५ मिनिटे वेळ, खरं आयुष्य तर मोहिद जगत आहे. या ट्विटवर आत्तापर्यंत १७ हजारांहून अधिक लाईक्स आणि शेकडो कमेंट्स आल्या आहेत. काही युजर्सनी, फायटिंगची वेळ जरा जास्तच ठेवली नाही का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. एकूणच हे टाईमटेबल लोक खूप एन्जॉय करत आहेत. पण यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.