राज्यातील ग्रामपंचायतींना ६९२.६७ कोटी चा निधी उपलब्ध. : ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची माहिती

Santosh Gaikwad March 30, 2023 12:05 AM

मुंबई दि.२९  : पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशी नुसार राज्यातील ग्रामपंचायतींना ६९२.६७ कोटी चा निधी उपलब्ध झाला असून आतापर्यंत जवळपास २५४३ कोटी रुपये येवढा निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आज दिली.

सन २०२२-२३ चा अबंधित निधी रु ७२२.२७ कोटीचे वितरण ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना करण्यात येणार असून सदर निधी मध्ये जिल्हा परिषदांना जवळपास १४.५९ कोटी, रुपये याचबरोबर राज्यातील पंचायत समितीना १५.०१ कोटी आणि ग्रामपंचायतींना ६९२.६७ कोटी रूपये वितरीत करण्यात येणार असल्याची माहितीही ग्रामविकास मंत्री  महाजन यांनी दिली.


राज्यातील ग्रामपंचायतींच्या बळकटीकरणासाठी या निधीच्या माध्यमातून मदत होणार असून ग्रामीण भागातील ग्रामीण रस्ते वाड्या वस्त्या,शेत रस्ते तसेच मुलभूत सोयी सुविधा युक्त कामांना गती मिळणार असल्याचे ही यावेळी त्यांनी सांगितले 

 संबंधित निधी उपलब्ध होण्यासाठी ग्रामविकास मंत्री  गिरीश महाजन यांनी सतत केंद्रीय ग्रामविकास मंत्री यांच्या सोबत पत्रव्यवहार तसेच प्रत्येक्षात भेटून सतत पाठपुरावा केला या मुळे राज्याला भरघोस निधी उपलब्ध होण्यासाठी मदत झाली असून तो तात्काळ संबंधित विभागाच्या माध्यमातून वितरीत करण्यात येणार आहे.