मुंबई उपनगर जिल्ह्यात ७४ लाख ४८ हजार मतदार !
Santosh Gaikwad
May 15, 2024 08:36 PM
मुंबई, दि १५ : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही मतदारसंघात सोमवार २० मे २०२४ रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा यावेळेत मतदान होणार आहे. या मतदानाची सर्व तयारी जिल्हा प्रशासनाने पूर्ण केली आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात ७४ लाख ४८ हजार ३८३ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील, अशी माहिती निवडणूक शाखेने दिली आहे.
मुंबई उपनगर जिल्ह्यात लोकसभेचे २६- मुंबई उत्तर, २७- मुंबई उत्तर पश्चिम, २८- मुंबई उत्तर पूर्व, २९- मुंबई उत्तर मध्य या मतदारसंघांचा समावेश आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात एकूण सात हजार ३८४ मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रांवर नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदानाची तयारी पूर्णत्वास आली आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६ मतदारसंघात एकूण ७३८४ मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रांवर ४० लाख २ हजार ७४९ पुरुष तर ३४ लाख ४४ हजार ८१९ महिला, आणि ८१५ तृतीयपंथी असे एकूण ७४ लाख ४८ हजार ३८३ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
२६- मुंबई उत्तर मतदारसंघात विधानसभेचे बोरिवली, दहिसर, मागाठाणे, कांदिवली (पूर्व), चारकोप, मालाड (पश्चिम) या मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघात एकूण १७०२ मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रांवर ९ लाख ६८ हजार ९८३ पुरुष, तर ८लाख ४२ हजार ५४६ महिला, तसेच ४४३ तृतीयपंथी असे एकूण १८ लाख ११ हजार ९४२ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील.
२७- मुंबई उत्तर पश्चिम या मतदारसंघात विधानसभेचे जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी पश्चिम आणि अंधेरी या मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघात १७५३ मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रांवर ९ लाख ३८ हजार ३६५ पुरूष मतदार तसेच ७ लाख ९६ हजार ६६३ महिला मतदार तर ६० तृतीयपंथी असे एकुण १७ लाख ३५ हजार ८८ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील.
२८- मुंबई उत्तर पूर्व या मतदारसंघात विधानसभेचे मुलुंड, विक्रोळी, भांडुप पश्चिम, घाटकोपर पश्चिम, घाटकोपर पूर्व तसेच मानखुर्द शिवाजीनगर या मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघात १६८२ मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रांवर ८ लाख ७७ हजार ८५५ पुरूष मतदार तसेच ७ लाख ५८ हजार ७९९ महिला मतदार तर २३६ तृतीयपंथी असे एकूण १६ लाख ३६ हजार ८९० मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील.
२९- मुंबई उत्तर मध्य या मतदारसंघात विधानसभेचे विलेपार्ले, चांदीवली, कुर्ला एससी, कलीना, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम या मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघात १६९८ मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रांवर ९ लाख ४१ हजार २८८ पूरूष मतदार तसेच ८ लाख २ हजार ७७५ महिला मतदार तर ६५ तृतीयपंथी असे एकूण १७ लाख ४४ हजार १२८ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील.
३० - मुंबई दक्षिण मध्य या मतदारसंघात अणुशक्ती नगर आणि चेंबुर या मतदारसंघात ५४९ मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रांवर २ लाख ७६ हजार २५८ पुरूष मतदार तसेच २ लाख ४४ हजार ३६ महिला मतदार तर ४१ तृतीयपंथी असे एकूण ५लाख २० हजार ३३५ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील.
--------------