९९एकर्स डॉटकॉमने ‘इनसाइट्स’ फीचर लॉन्च केले
Santosh Sakpal
May 11, 2023 11:29 PM
~ ग्राहकांना प्रॉपर्टीसंदर्भात योग्य निर्णय घेण्यास मदत होणार ~
मुंबई, : प्रॉपर्टी पोर्टल ९९एकर्स डॉटकॉमने ग्राहकांना प्रॉपर्टीसंदर्भात योग्य निर्णय घेण्यास मदत करण्यासाठी अद्वितीय फीचर ‘इनसाइट्स’ लाँच केले आहे. हे नवोन्मेष्कारी रिअल इस्टेट इंटेलिजन्स सोल्यूशन ग्राहकांना परिसर, किमती, रहिवाशांचे पुनरावलोकन यांबाबत सर्वांगीण माहिती देत त्यांचा होम सर्च व संशोधन प्रवास एकसंधी करण्यास मदत करते.
प्रॉपर्टी खरेदी-विक्री करणाऱ्या किंवा भाड्याने देणाऱ्या-घेणाऱ्या व्यक्तींना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. ही प्रक्रिया वेळखाऊ आहे, जयामध्ये अधिक प्रमाणात संशोधानाचा समावेश आहे आणि विश्वसनीय माहिती मिळण्यासंदर्भात मोठी समस्या आहे. ‘इनसाइट्स’ एक-थांबा सोल्यूशन आहे, जे ग्राहकांना भारतभरातील परिसर व गृहनिर्माण सोसायटींबाबत सविस्तर माहिती देते, ज्यामुळे त्यांना योग्य निर्णय घेण्यास मदत होते.
‘इनसाइट्स’ने लाखो ग्राहकांना त्यांच्या प्रॉपर्टी-संबंधित गरजांसंदर्भात मदत केली आहे. या वैशिष्ट्याला तीन लाख रहिवाशांकडून पुनरावलोकन मिळाले असून दर महिन्याला २०,००० रिव्ह्यूंची भर होत आहे. रेटिंग्ज व रिव्ह्यू ९,६०० परिसरांमधील व ४,६०० सोसायटींमधील रहिवाशांच्या वास्तविक, नि:पक्षपाती पुनरावलोकन देतात, ज्यामधून त्यांचे फायदे व तोटे दिसून येतात. यामधून ग्राहकांना परिसर किंवा सोसायटीबाबत सखोल माहिती मिळते, जी अन्यथा त्यांना तेथे प्रत्यक्ष राहायला गेल्याशिवाय माहित पडत नाही.
प्राइस ट्रेण्ड्स विद्यमान बाजारपेठ किंमत दाखवतात आणि परिसर/सोसायटी किमतीमधील वाढ किंवा घट बाबत माहिती देखील देतात. तसेच, प्रॉपर्टी ट्रॅन्झॅक्शन प्राइसेसच्या माध्यमातून ग्राहक रजिस्ट्री नोंदीनुसार अलिकडील व्यवहार डेटा जाणून घेऊ शकतात आणि सर्वोत्तम डील करू शकतात. लोकॅलिटी इनसाइट्स सुरक्षितता, सुविधा, आगामी विकास आणि हॉस्पिटल्स, मेट्रो, मॉल्स इत्यादींप्रती कनेक्टीव्हीटी अशा घटकांवर परिसर व सोसायटींचे सर्वांगीण अवलोकन देते आणि ग्राहकांना सखोल माहिती मिळण्यास मदत करते.
इन्फोएजचे सीएमओ सुमीत सिंग म्हणाले, ‘‘ग्राहकांना प्रॉपर्टीसंदर्भात योग्य निर्णय घेण्यास मदत करण्याचा आणि त्यांच्या गरजांची प्रभावीपणे पूर्तता करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही ग्राहकांना अचूक व पारदर्शक माहिती देण्यासाठी आणि त्यांच्या होम सर्च व संशोधन प्रवासामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी ‘इनसाइट्स’ लाँच केले. आम्हाला आतापर्यंत ‘इनसाइट्स’साठी सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे आणि आम्हाला विश्वास आहे की, आम्ही या नवोन्मेष्कारी सोल्यूशनसह ग्राहकांना उत्तम सेवा देण्यामध्ये यशस्वी होऊ.’