परदेशातील बाप्पाची लाईव्ह प्राणप्रतिष्ठा : पहिल्याच वर्षी २ हजार भक्तांचा प्रतिसाद !

Santosh Gaikwad September 21, 2023 04:42 PM



डोंबिवली :  डोंबिवलीतून थेट दुबई, अमेरिका, इंग्लंड, नेदरलँड, कॅनडा आणि इतर देशात यूट्यूब लाईव्ह द्वारे गुरूजी कडून हिंदी आणि मराठी या भाषेत गणेशमूर्ती स्थापना आणि प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. पहिल्याच वर्षी ऑल इन वन गुरुजी यांच्या यूट्यूब लाईव्ह गणेश पूजेला 2000 पेक्षा जास्त गणेश भक्तांनी भेट दिली आणि आपल्या घरची गणेशमूर्ती स्थापना आणि प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. ही पूजा मोफत होती त्यासाठी कोणतेही देणगीचे बंधन नव्हते. पुढील वर्षीही ऑल इन वन गुरुजी तर्फे मोफत गणेश पूजेचे आयोजन करण्यात येणार आहे.

ऑल इन वन गुरुजी या संस्थेचे नुकतेच उद्घाटन झाले होते. या संस्थचे प्रमुख सचिन कुलकर्णी गुरुजी व सागर धारगळकर यांच्या संकल्पनेतून देशातील तसेच विदेशातील सर्व गणेश भक्तांसाठी यूट्यूब लाईव्ह गणेश पूजेचे आयोजन करण्यात आलेले. तसेच या लाईव्ह पूजेच्या बातमीला सर्व सोशल मीडिया तसेच प्रिंट मीडिया कडून चांगला प्रतिसाद मिळाला. या 

ऑल इन वन गुरुजी लवकरच ऑनलाईन भरणी श्राद्ध, नवरात्री घटस्थापना आणि इतर पूजा ऑनलाईन झूम अथवा गूगल मिट ने करण्याचे आयोजन करीत आहेत त्या साठी ऑल इन वन गुरुजी यांच्या ॲप, वेबसाईटला आणि यूट्यूब चॅनलला जरूर भेट द्या असे आवाहन करण्यात आले आहे.