अभिनेत्री भाग्यश्री मोटेने घेतला पुरणपोळीचा आस्वाद

Santosh Sakpal 20, 5-06 09:48 PM

नवी मुंबई/ वाशी, ५ मे २०२३ : महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय असा पदार्थ ते म्हणजे पुरणपोळी. महाराष्ट्रात पुरणपोळीला एक वेगळं महत्त्व आहे. आजच्या घाई गडबडीच्या जीवनशैलीत अनेकांना पूर्वीसारखे पुरणपोळ्या करणे जमत नाही. त्यामुळेच नवी मुंबईतील वाशी येथील भास्कर्स पुरणपोळी घर च्या माध्यमातून तब्बल २५ प्रकारच्या पुरणपोळीचा चव चाखता येणार आहे. नुकतेच अभिनेत्री भाग्यश्री मोटेच्या हस्ते या पुरणपोळी घर चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विठ्ठल शेट्टी सह अनेक मान्यवर उपस्थित होते. दरम्यान भाग्यश्रीने ही या पुरणपोळीचा आस्वाद घेतला.

यावेळी अभिनेत्री भाग्यश्री मोटे म्हणाली की, "माझ्यासारख्या महाराष्ट्रीय लोकांसह सर्वच जणांसाठी पुरणपोळी हा एक आवडता पदार्थ आहे, आणि माझ्याकडून भास्कर पुरणपोळी घरच्या आउटलेटच्या उद्घाटन व्हावे हा माझ्यासाठी गर्वाचा क्षण आहे. मी बीपीजी युनिकॉर्न एलएलपी टीमला शुभेच्छा देते आणि नवी मुंबईतील सर्वांसाठी हे पुरणपोळी घर म्हणजे अनोखा उपक्रम असून सर्वांनी आस्वाद घ्यावा." असे आवाहन भाग्यश्रीने यावेळी केले. भास्कर पुरणपोळी घर चे विठ्ठल शेट्टी यावेळी म्हणाले की, हे बीपीजी युनिकॉर्न एलएलपीचा उपक्रम आहे, ज्यांना अन्न, संचालन आणि व्यवस्थापन रचना या क्षेत्रात २० ते २५ वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्राच्या पुरणपोळीची मूळ चव संस्कृती जपण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. २०२१ पासून ३ लाख जणांपर्यंत ही सेवा पोहचली असून खमंग पुरणपोळ्यांच्या २५ पेक्षा अधिक प्रकारांसह कुठलेही रासायनिक पदार्थ न वापरता हे पदार्थ बनविले जातात" अशी माहिती शेट्टी यांनी दिली.