MENU

अमित शहांनंतर शिवसेनेने व्यंगचित्राच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंना डिवचले

Santosh Gaikwad July 23, 2024 01:10 PM


मुंबई - दहशतवाद्यांना पाठीशी घालणाऱ्या काँग्रेसला उद्धव ठाकरेंनी साथ दिली. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी ही औरंगजेब फॅन क्लब आहे. तर या क्लबचे नेते म्हणून उद्धव ठाकरेंची ओळख आहे, अशी जोरदार टीका नुकत्याच झालेला पुण्यातील एका कार्यक्रमात देशाचे गृहमंत्री .अमित शाह यांनी केली. याच विषयावर आता शिवसेना पक्षानेही आपल्या फेसबुक पेजवर प्रसारित झालेल्या व्यंगचित्राच्या माध्यमातून उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीकास्त्र सोडले आहे.


२०१९ साली स्वतःच्या स्वार्थी राजकारणासाठी आणि मुस्लीम मतांसाठी भगव्याशी आणि हिंदुत्ववादी विचारांशी फारकत घेऊन उद्धव ठाकरेंनी आपली विचारसरणी बदलून टाकली. हिंदू जनता जुमानत नाही , हे समजल्यावर मतांच्या हव्यासापोटी औरंग्या वृत्तींना पाठबळ देण्याची रणनीती उद्धव ठाकरे आखत आहेत असा आरोप शिवसेनेने केला.

अमित  शहा यांच्या जोरदार टीकेपाठोपाठ शिवसेना पक्षानेही व्यंगचित्राच्या माध्यमातून उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीकास्त्र सोडले. हे व्यंगचित्र पक्षाच्या अधिकृत फेसबुक पेजवर प्रसारित झाले असून या व्यंगचित्राची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.