• आंतरराष्ट्रीय कॉल्स आणि एस. एम. एस साठी कव्हरेज वाढवले
• मराठी आणि आणखी 9 स्थानिक भाषांमध्ये स्पॅमची चेतावणी दर्शविणार (स्पॅम अलर्ट डिस्प्ले सादर करत आहे)
मुंबई,: एअरटेलने असे एआय द्वारा समर्थित स्पॅम शोधणारे साधन (डिटेक्शन टूल) लाँच केले आहे ज्याने आपल्या ग्राहकांना स्पॅम म्हणून 27.5 बिलियन कॉल्स चिन्हांकित करून दाखविले आहेत आणि या लाँच नंतर आज स्पॅमर्सच्या दोन पाऊले पुढे राहण्याच्या उद्देशाने दोन महत्त्वपूर्ण सुधारणा सादर करण्याची घोषणा केली आहे.
ग्राहकांना आता त्यांच्या पसंतीच्या भारतीय भाषांमध्ये कॉल्स आणि एस.एम.एस संदेशांसाठी स्पॅम अलर्ट्स मिळणार आहेत. हे नवे वैशिष्ट्य दहा स्थानिक भाषांमध्ये उपलब्ध होणार आहेत आणि यामध्ये पुढे जाऊन आणखी भर घालण्याची योजना आखलेली आहे. एअरटेलचे एआय द्वारा समर्थित साधन आता ग्राहकांना आंतरराष्ट्रीय नेटवर्क वरून येणारे सर्व स्पॅम कॉल्स आणि एस.एम.एस शोधून काढून त्याची चेतवणी (अलर्ट) देणार आहे.
एअरटेल ने देशांतर्गत स्पॅम कॉल्सचा सामना करण्यासाठी आपले प्रयत्न तीव्र केले आणि त्यानंतर, घोटाळेबाज आणि स्पॅमर्स यांनी परदेशी नेटवर्कचा गैरवापर करून भारतात फसवे कॉल पाठविण्यास सुरुवात केली. या भीतीदायक प्रवृत्तीमुळे गेल्या सहा महिन्यांमध्ये परदेशी स्पॅम कॉल्सचे प्रमाण 12% ने वाढलेले आहे. नवे वैशिष्ट्ये सादर करून एअरटेल हे वाढते आव्हान निष्प्रभावी करण्याची अपेक्षा करत आहे.
या उपक्रमावर भाष्य करताना सिद्धार्थ शर्मा, डायरेक्टर मार्केटिंग आणि सी.ई.ओ कनेक्टेड होम्स, भारती एअरटेल म्हणाले, "आम्ही करत असलेल्या गोष्टींच्या केंद्रस्थानी आम्ही ग्राहक आणि त्यांचा अभिप्राय ठेवतो. ग्राहकांच्या अभिप्रायाचे काळजीपूर्वक विश्लेषण केल्यानंतर, आम्ही आमच्या उपायांमध्ये सुधारणा केली आहे जेणेकरून भारतातील भाषिक विविधतेची अधिक चांगल्या प्रकारे सेवा करता येईल. याव्यतिरिक्त, स्पॅम रहदारीचे वाढते प्रमाण परदेशी नेटवर्कवर स्थलांतरित झाल्याने, आम्ही आमच्या एआय द्वारा समर्थित साधनाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे जेणेकरून आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून येणारे सर्व एस.एम.एस संदेश आणि फोन कॉल्स तपासता येतील. अभियंते आणि डेटा शास्त्रज्ञांची आमची समर्पित टीम आम्ही देऊ केलेल्या गोष्टी सुधारण्याचे आणि वाढविण्याचे काम करत राहील. यामुळे आम्ही कोणत्याही आणि आमच्या पुढे येत राहणाऱ्या सर्व धोक्यांना मागे सारत आहोत याची खात्री केली जाईल."
अद्ययावत एआय-संचालित स्पॅम उपाय आता वापरकर्त्यांना दहा भारतीय भाषांमध्ये देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय क्रमांकांवरील कॉल्स आणि संदेशांबद्दल सूचित करणार आहे. या भाषांमध्ये हिंदी, मराठी, बंगाली, गुजराती, तमिळ, कन्नड, मल्याळम, तेलुगू, पंजाबी आणि उर्दू सामील आहेत. अँड्रॉइड डिव्हाइस वापरणाऱ्या ग्राहकांसाठीच फक्त स्थानिक भाषांचा वापर करून स्पॅम अलर्ट सूचना उपलब्ध केल्या जाणार आहेत. या सर्व वैशिष्ट्यांसाठी ग्राहकांना कोणतीही रक्कम भरावी लागणार नाही आणि सर्व एअरटेल ग्राहकांसाठी ती आपोआप सक्रिय केली जाणार असून त्यासाठी त्यांना सेवा विनंती द्यावी लागणार नाही.
एअरटेलचे नाविन्यपूर्ण, उद्योगातील पहिले स्पॅमविरोधी साधन सप्टेंबर 2024 मध्ये लाँच केले गेले होते आणि त्याने आपल्या ग्राहकांसाठी चित्र पालटवून टाकलेले आहे. यामुळे नको असलेल्या संदेशांपासून पुरेसा आराम लाभलेला आहे. एअरटेलने दिलेल्या माहितीनुसार, तिने आतापर्यंत 27.5 बिलियन कॉल्सची ओळख पटविलेली आहे. याचा अर्थ दर सेकंदाला मोठ्या प्रमाणावर 1560 स्पॅम कॉल्स केले जात आहेत. सप्टेंबर 2024 मध्ये लाँच झाल्यापासून एअरटेलच्या ग्राहकांना येणाऱ्या स्पॅम कॉल्सचे प्रमाण 16% ने कमी झालेले आहे.