नाशिक : अजित पवार यांना अर्थ खात मिळाल्यानंतर ते झपाटून कामाला लागले आहेत. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा त्यांनी नाशिक दौरा करीत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला हजेरी लावली. राज्यात ट्रिपल इंजिन सरकार आल असून, नाशिकला निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही पवार यांनी दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिक दौऱ्यावर आहेत. मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर लगेचच अजित पवारांनी झपाट्याने आपल्या कामाला सुरूवात केली. अजित पवारांच्या या दौऱ्यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी उपस्थित राहत शक्तिप्रदर्शन केले. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नाशकात मोठी सभा घेतली होती. यावेळी त्यांनी अजित पवारांसह फुटलेल्या गटावर हल्लाबोल केला होता. आता अजित पवार देखील नाशकात सभा घेऊन शरद पवारांना प्रत्युत्तर देणार आहेत.
शासन आपल्या दारी' हा उपक्रम आज नाशिकमध्ये पार पडत आहे. या उपक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिक दौऱ्यावर आहेत. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार नाशकात आल्याने फुलांची उधळण करत कार्यकर्त्यांकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना अजित पवार यांनी देशात मोदींच्या नेतृत्वाखाली कणखर नेतृत्व लाभले असून केंद्राच्या मदतीने राज्याला गती देण्यासाठी काम सुरू; अशी ग्वाही दिली.