मी कुठल्याही चौकशीला तयार : अजित पवार

Santosh Gaikwad October 17, 2023 11:42 PM


मुंबई दि. १७ ऑक्टोबर :   पुण्यातील येरवडा तुरुंगाबाहेरील जमीन खासगी बिल्डरला देण्याच्या प्रकरणात माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी आता थेट राज्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाव घेतलं आहे. त्यावर अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. कुठल्याही ठिकाणी माझी सही नाही, कुठल्याही ठिकाणी मी यासंदर्भात मिटिंगला हजर नव्हतो, या प्रकरणाचा माझा अर्थाअर्थी संबंध नाही, असा दावा अजित पवार यांनी केला आहे.  मी कुठलीही चौकशीला मी तयार असे अजित पवार म्हणाले.  

 

अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत घेऊन मीरा बोरवणकर यांच्या आरोपाचे खंडन केले. पवार म्हणाले की, "ज्या कंपनीला जमीन देण्याचा निर्णय झाला होता त्या कंपनीचं नाव ईडीच्या प्रकरणात आल्यानंतर सरकारनेच त्या कंपनीला जमीन देण्याचा निर्णय रद्द केला, कुणामुळे हा निर्णय बदलला गेला नाही, काहीजण सांगतात माझ्या मुळे निर्णय बदलला. असं नाहीय. आज देखील जागा पोलीस खात्याच्या अखत्यारीत आहे," असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. सरकारच्या विरोधात जाणारे निर्णय मी कधीच घेतले नाहीत, असा दावासुद्धा अजित पवार यांनी केला आहे. मीरा बोरवणकरांच्या आरोपांशी माझा संबंध नाही,  हा निर्णय आबांनी निर्णय घेतला, गृह खात्यानं निर्णय घेतला, मी काहीही केलं नाही, त्या प्रकरणाची कागदपत्र मी पुन्हा तपासली, असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलं आहे. काहींना पुस्तक लिहिताना खळबळजनक काही गोष्टी लिहिल्या की, त्याला वेगळ्या प्रकारची प्रसिद्धी मिळते त्यामुळे तसेही कदाचित झाले असेल असा टोला लगावतानाच विरोधी पक्षांनी चौकशीची मागणी केली आहे. कुठलीही चौकशी करा मी तयार आहे असे थेट आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज पत्रकार परिषदेत दिले. दरम्यान या प्रकरणात कुठेही माझी सही नाही, बैठकीला उपस्थित नव्हतो. या प्रकरणाशी माझा अर्थाअर्थी संबंध नाही असा खुलासाही अजित पवार यांनी केला. 


१९९१ मध्ये या मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली आहे.त्यानंतर अनेक पदांवर काम करण्याची संधी मिळाली. अनेक मुख्यमंत्र्यांसोबत काम करता आले. मी कधीही सरकारचं नुकसान होईल अशाप्रकारचा निर्णय घेत नाही. एखादा चुकीचा निर्णय असेल तर मी तात्काळ तो निर्णय रद्द करतो. मी आजपर्यंत ३२ वर्षात कुठल्याही सनदी अधिकारी, वरीष्ठ अधिकारी यांच्याशी व्यवस्थित बोलत आलो आहे. माझा स्वभाव कडक असला तरीदेखील... असेही अजित पवार मिश्किलपणे म्हणाले.  माझ्या खात्यातील बदल्यांचा अधिकारसुध्दा आयुक्तांना असतो मी अजिबात हस्तक्षेप करत नाही असेही अजित पवार यांनी ठणकावून सांगितले.  या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे उपस्थित होते.