मुंबई : प्रेस्टिज हा सर्वात विश्वसनीय व अग्रगण्य किचन अप्लायन्स ब्रॅण्ड त्यांच्या बहुप्रतिक्षित ‘एनीथिंग फॉर एनीथिंग’ एक्स्चेंज ऑफरसह परतला आहे. ग्राहक विविध प्रेस्टिज उत्पादनांसाठी एमआरपीवर २४ टक्क्यांपासून ६६ टक्क्यांपर्यंत सूट देणाऱ्या या आकर्षक एक्स्चेंज ऑफरचा लाभ घेण्यासाठी त्यांचे जुने किचन अप्लायन्सेस आणून एक्स्चेंज करू शकतात. इतर कोणत्याही मोहिमेच्या तुलनेत एनीथिंग फॉर एनीथिंग मोहिम ग्राहकांना कोणत्याही ब्रॅण्डचे व कोणत्याही स्थितीमध्ये असलेले जुने किचन अप्लायन्स एक्स्चेंज करून प्रेस्टिजची नवीन उत्पादने खरेदी करण्याची सुविधा देते. ही ऑफर १५ एप्रिलपासून सुरू झाली असून ३० जून २०२३ पर्यंत सुरू राहिल.
प्रेस्टिजची नवोन्मेष्काराप्रती समर्पितता प्रसिद्ध आहे. प्रत्येक उत्पादन प्रगत व आधुनिक तंत्रज्ञानासह डिझाइन केले जाते, ज्यामधून होम-कूक्सना स्वच्छ, त्रास-मुक्त व सोईस्कर कूकिंग अनुभव मिळतो. ‘एनीथिंग फॉर एनीथिंग’ एकस्चेंज ऑफरच्या माध्यमातून ग्राहकांना प्रेस्टिजच्या नवीन नवोन्मेष्कारांसह त्यांचे किचन अपग्रेड करण्याची अद्भुत संधी मिळेल.
प्रेस्टिजकडून त्यांच्या सर्व उत्पादन श्रेणींवर लक्षणीय सूट ऑफर करण्यात आली आहे. यामध्ये प्रेशर कूकर्सच्या फ्लिप-ऑन स्वच्छ श्रेणीचा समावेश आहे, ज्यामध्ये स्पिलेज कंट्रोल लिड व इनोव्हेटिव्ह लिड-लॉक तंत्रज्ञान आहे. तसेच ऑफरमध्ये अद्वितीय ईजी-टू-क्लीन डिझाइन व लिफ्टेबल बर्नर वैशिष्ट्ये असलेल्या गॅस स्टोव्ह्जच्या क्रांतिकारी स्वच्छ श्रेणीचा देखील समावेश आहे.
टीटीके प्रेस्टिजचे विक्री व विपणनाचे कार्यकारी उपाध्यक्ष श्री. दिनेश गर्ग म्हणाले, ‘‘प्रेस्टिजमध्ये आम्ही प्रत्येक ग्राहकाच्या गरजांसाठी अद्वितीय उत्पादने व नवोन्मष्कार असण्याची खात्री घेतो, ज्यामध्ये टिकाऊ किचन कूकवेअर, अप्लायन्सेस किंवा नवीन तंत्रज्ञान-केंद्रित उत्पादनांचा समावेश आहे. आमचे ग्राहक ब्रॅण्डप्रती निष्ठावान आहेत आणि या ऑफरच्या माध्यमातून आमचा त्यांच्यासोबत निर्माण केलेले संबंध साजरे करण्यासाठी त्यांना आकर्षक डील्समध्ये सर्वोत्तम उत्पादने देण्याचा मनसुबा आहे.’’