अपना बाजार मुलुंड शाखेचा ४७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

Santosh Gaikwad May 30, 2024 10:53 PM


मुंबई: दर्जा, गुणवत्ता, विश्वासाहर्ता व पैशाची बचत यामुळे ग्राहकांमध्ये लोकप्रिय ठरलेल्या अपना बाजारच्या मुलुंड शाखेचा 47 वा वर्धापन दिन बुधवारी 29 तारखेला उत्साहात साजरा झाला. 

यावेळी कार्याध्यक्ष अपना बाजार संचालक मंडळ - कार्याध्यक्ष अनिल गंगर, अध्यक्ष श्रीपाद पाठक, उपाध्यक्ष, आश्विन उपाध्याय, जगदीश नलावडे, अनिल ठाकुर, स्वप्नील कदम , मुलुंड शाखेचे वसंतराव भोसले-अध्यक्ष, चिटणीस महेश मलुष्टे, विनोद निकम-व्यवस्थापक आणि समिती सदस्य ऍड. प्रशांत गायकवाड, नम्रता जाधव, सोनाली सावंत, विनय गायधनी, श्रीकांत कोयंडे, शाखा कर्मचारी उपस्थित होते. 

अनिल गंगर म्हणाले की, "अपना बाजारने सहकारात विश्वास निर्माण केला आहे. पुढील काही वर्षांत अपना बाजार खूप प्रगती करेल. मुलुंड शाखेचे समिती, कर्मचारी, ग्राहक यांनी ज्या उत्साहात 47 वा वर्धापन दिन साजरा केला, त्यामुळे आमचा विश्वास खूप वाढला आहे."

प्रतिष्ठित मान्यवर- मराठा मंडळ - महेश चव्हाण, कार्याध्यक्ष , उपाध्यक्ष अरुण चव्हाण, अजय खामकर, सरचिटणीस सल्लागार श्री.सुरेश डुंबरे, श्री.कदम, महिला आघाडी प्रमुख माधुरी तळेकर, सांस्कृतिक समिती प्रमुख रश्मी राणे,वाचनालय प्रमुख मिनल सावंत, सहचिटणीस व समन्वयक ऐश्वर्या ब्रीद, कोषाध्यक्ष ज्ञानेश्वर भालेराव , राजन भोसले, विजया साटम, स्मिता पवार, मनसे च्या सायली दळवी,संदीप कदम, महाराष्ट्र सेवा संघ चे अध्यक्ष चंद्रशेखर वझे, विजय वैद्य. अरूण भंडारी, नंदीनी हंबरडे- न चि केळकर ग्रंथालय, विरंगुळा केंद्र, कल्पना विहार महिला मंडळ, जुन्नर अंबेगाव विकास मंच, अनेक मान्यवर जुने जाणते ग्राहक, हितचिंतक. शुभेच्छा देण्यास उपस्थित होते. अनेकांनी उपस्थितांसमोर आपल्या भावना व्यक्त केल्या.

दरम्यान, अपना बाजार ही लालबाग, परळ, नायगाव, वडाळा परिसरातील समाजवादी कार्यकर्त्यांनी १९४८ साली स्थापन केलेली संस्था असून गतवर्षीच संस्थेच्या स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण झाली. संस्थेच्या एकूण २२ शाखा असून आद्य मॉल सुरू करण्याचे श्रेय अपना बाजार कडेच जाते.