कुख्यात गुंड अतिक अहमदची गोळ्या घालून हत्या; दोनच दिवसांपूर्वी मुलाला एन्काऊनटरमध्ये ठार मारले होते आता त्याचा गुंड बाप अतिक अहमद आणि त्याचा काका अशरफ अहमद यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
उत्तर प्रदेशमधील कुख्यात गुंड अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. दोघांनाही वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात असताना प्रयागराज वैद्यकीय महाविद्यालयाजवळ त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या हल्यात दोघांचाही मृत्यू झाला आहे. दरम्यान, याप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं असल्याची प्राथमिक माहिती आहे.
कोण होता अतिक अहमद?
गुंड अतिक अहमद हा २००५ मधील बसपा आमदार राजू पाल हत्याकांड आणि फेब्रुवारीमध्ये झालेल्या उमेश पाल हत्याकांडातील प्रमुख आरोपी होता. तसेच अतिक अहमदवर उत्तर प्रदेशमध्ये अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. यामध्ये खून, खंडणी अशा गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे.