भाजप आमदार गणपत गायकवाडसह सात जणांविरोधात ॲट्रॉसिटी गुन्हा
Santosh Gaikwad
February 04, 2024 09:47 PM
कल्याण :भाजपचे आमदार गणपत गायकवाड आता गायकवाड यांच्या अडचणीत आणखीनच वाढ झाली आहे.जमिनीच्या वादात झालेल्या गोळीबारात आता गायकवाडांसह सात जणांविरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात हिललाईन पोलिस ठाण्यात आमदार गायकवाड यांच्यासह जितेंद्र पारीख, वि्ठठल चिकणकर, शिवाजी फुलोरे, सौरभ सिंग, छोटू खान, चंद्रकात ओल ,मंगेश वारघेट यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे आमदार गायकवाड यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे समोर आले.
जागेच्या वादातून उल्हासनगर पोलीस ठाण्यात आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड आणि त्यांचे सहकारी राहुल पाटील यांच्यावर गोळीबार केला. या प्रकj.kh पोलिसांनी आमदार गायकवाड यांच्यासह दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान जागेच्या वादावरुन हा गोळीबार करण्यात आला अशी माहिती समोर आली होती. या प्रकरणात भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या आठ जणांच्या विरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा जागा मालकाच्या तक्रारीवरुन दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता गणपत गायकवाड यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
नेमकं प्रकरण काय?
अंबरनाथ तालुक्यातील द्वारली गावात 31 जानेवारी रोजी एका जागेवरुन वाद झाला. जागा मालकाच्या कुटुंबियांसोबत भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा वाद झाला होता. यावेळी आमदारांसह सात जणांनी जागा मालक मधूमती एकनाथ जाधव आणि त्यांच्यासोबत असलेल्या महिलांना जातीवाचक शिवीगाळ केला. त्यांच्या जातीचा उल्लेख करत तुमची जमीन घेतल्याशिवाय आम्ही तुम्हाला सोडणार नाही, असं गणपत गायकवाडांनी म्हटल्याचं यावेळी या महिलांनी सांगितला.
या वादातून आमदार गायकवाड आणि शिवसेना शहर प्रमुख गहेश गायकवाड पोलीस ठाण्यात गेले होते. या प्रकरणी पोलीस ठाण्यात चर्चा सुरु होती. या चर्चेच्या दरम्यान पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरिक्षकांच्या केबीनमध्ये आमदारांनी महेश गायकवाड यांच्यासह त्याची साथीदार राहुल पाटील याच्यावर गोळ्या झाडल्या.
गणपत गायकवाड यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला
आमदार गणपत गायकवाड यांना 14 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. गणपत गायकवाड यांची बंदूक पोलिसांकडून जप्त करण्यात आली. तसेच ठाणे पोलिसांकडून गायकवाड यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.