औरंगजेबाच्या उपमेवरून राजकारण तापलं...

Santosh Gaikwad March 21, 2024 08:02 PM


मुंबई : शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना औरंगजेबाशी केल्याने राजकीय वातावरण चांगलचं रंगल्याचे दिसून आले. राऊतांच्या वक्त्व्यावर थेट मोदींनी प्रत्युत्तर दिलं. तर पंतप्रधानांना औरंगजेब म्हणणं म्हणजे या देशाचा अपमान आहे. पंतप्रधानांना औरंगजेबाची उपमा देणं हा देशद्रोह आहे. अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊतांना प्रतिउत्तर दिलय. त्यामुळे आता  लोकशाहीचा उत्सव सुरू झाल्यानंतर आत आरोप प्रत्यारोपाला सुरूवात झाल्याचे दिसून येतय. 

 आपल्या एका भाषणात संजय राऊतांनी मोदींची तुलना औरंगजेबाशी केली होती. औरंगजेबाचा जन्म हा नरेंद्र मोदी यांच्या गावाजवळ झालेला आहे. त्यामुळे दोघांचीही विचारसरणी सारखीच आहे, असे राऊत म्हणाल होते. लोकसभा निवडणूक जाहीर झाली असली तरी अजूनही काही जागांवार उमेदवार निश्चित झालेले नाहीत मात्र राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचाराला सुरूवात झाली असून आरोप प्रत्यारोपाची  पगगगग्
 
झडल्या जात आहेत.   


यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही प्रतित्त्युर दिलं आहे. “आमचे विरोधकही निवडणुकीची तयारी करत आहेत. आजच त्यांनी माझ्याविषयी अनेक दुषण वापरलं. मला औरंगजेब केलं गेलं. मोदींचा शिरच्छेद करा अशी घोषणा केली गेली आहे. अशा सगळ्या नकारात्मक गोष्टी सुरु असल्या तरीही लोकशाहीचा उत्सव सुरु आहे. २६०० हून जास्त पक्ष. ९७ कोटी मतदार, दोन कोटी पहिल्यांदा मतदान करणारे मतदार या उत्सवात सहभागी होत आहेत”, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिले.  
 
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “देशभक्त आणि राष्ट्रभक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या देशाला नवी उंची दिली. बाळासाहेब ठाकरे यांचे राम मंदिर बनवण्याचे स्वप्न,  ३७० कलम हटवण्याचे स्वप्न हे पंतप्रधानांनी पूर्ण केले. त्यामुळे अशा पंतप्रधानांना औरंगजेब म्हणणं म्हणजे या देशाचा अपमान आहे. पंतप्रधानांना औरंगजेबाची उपमा देणं हा देशद्रोह आहे. खरतर यांची निंदा करावी तेवढी कमी आहे. औरंगजेबवृत्ती त्यांनी दाखवली. ज्या औरंगजेबाने भावाला, बापाला आणि नातेवाईकांना सोडलं नाही. औरंगजेबाची हिच वृत्ती त्यांनी दाखवली. पण याचे उत्तर या निवडणुकीत जनता मतपेटीद्वारे देईल”, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले.