बदामांच्या पोषणासह यंदाचा व्हॅलेंटाइन्स डे आरोग्यदायी करा
Santosh Sakpal
20, 2-14 11:32 AM
भारत, फेब्रुवारी १४, २०२४: प्रेमाचा सीझन सुरू होत असताना यंदाचा व्हॅलेंटाइन्स डे अनोख्या पद्धतीने साजरा करूया. पारंपारिक पद्धतीनुसार गोड पदार्थ व स्वादिष्ट मिष्टान्नांचा आस्वाद घेण्याऐवजी आरोग्य व स्वास्थ्याला प्राधान्य द्या. या परिवर्तनामुळे आरोग्यदायी पर्यायांची निवड करत नवीन पैलूंसह प्रेमाला साजरे करता येऊ शकते. तुमच्या खास व्यक्तीसाठी आरोग्यदायी व खास गिफ्ट म्हणजे विचारपूर्वक बनवलेला बदामांचा बॉक्स, ज्यामध्ये तुमचे प्रेम सामावलेले असण्यासह आरोग्य उत्तम राखण्याचे महत्त्व देखील दिसून येते.
उत्साहवर्धक व क्रंची चवीसाठी ओळखले जाणाऱ्या बदामांचे आरोग्यविषयक अनेक फायदे आहेत, ज्यामधून अर्थपूर्ण व पोषण गेस्चर व्यक्त होते. झिंक, फोलेट, आयर्न, व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम व प्रोटीन यांसारखे १५ पौष्टिक घटक असलेले हे पॉवरहाऊस नट्स अनेक आरोग्यदायी फायदे देतात. ते हृदयाचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत करतात, त्वचा कोमल होण्यास साह्य करतात, वजनावर नियंत्रण ठेवतात आणि रक्तातील शर्करेचे प्रमाणावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात. दैनंदिन आहारामध्ये बदामांचा समावेश केल्याने तुम्हाला स्वादिष्ट स्नॅकचा आस्वाद मिळण्यासोबत अनेक पौष्टिक घटक देखील मिळतात, ज्याचा तुमच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.
प्रेमाचा सीझन आणि दैनंदिन आहारामधील बदामांच्या महत्वाबाबत सांगताना बॉलिवुड अभिनेत्री सोहा अली खान म्हणाल्या, ''माझ्यासाठी व्हॅलेंटाइन्स डे प्रेम व्यक्त करण्यापेक्षा अधिक आहे. मी माझ्या प्रियजनांच्या आरोग्याची काळजी घेण्याला अधिक प्राधान्य देते. मी स्वत:चा आणि माझ्या कुटुंबाचा आहार आरोग्यदायी व संतुलित असण्याची खात्री घेते, तसेच आमच्या खाण्यामध्ये बदामांचा समावेश करते. एक खासबाब म्हणजे माझी मुलगी भूक लागली की, स्नॅक म्हणून अनारोग्यकारक खाद्यपदार्थांऐवजी बदामांचे सेवन करते. झिंक, प्रोटीन, व्हिटॅमिन ई यांसारख्या १५ पौष्टिक घटकांचे स्रोत असलेल्या बदामांचे अनेक आरोग्यदायी फायदे आहे, ज्यामुळे मी विचारशील व पोषक गिफ्ट म्हणून बदामांना प्राधान्य देते.''
दैनंदिन आहारामध्ये मूठभर बदामांचा समावेश करण्याच्या महत्त्वाबाबत सांगताना दिल्लीमधील मॅक्स हेल्थकेअर येथील डायटेटिक्सच्या प्रादेशिक प्रमुख रितिका समाद्दार म्हणाल्या, ''मी माझ्या क्लायण्ट्सना सतत त्यांच्या दैनंदिन आहारामध्ये मूठभर बदामांचा समावेश करण्याचा सल्ला देते. ही शिफारस करण्यामागील तथ्य म्हणजे बदामांचे प्रोटीन व डायटरी फायबरसह १५ आवश्यक पौष्टिक घटक आहेत, जे मधुमेहासारख्या जीवनशैलीविषयक आजारांचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. संशोधनाच्या मते, दैनंदिन आहारामध्ये बदामांचा समावेश केल्याने सेवन केल्या जाणाऱ्या कार्बोहायड्रेड पदार्थांचे रक्तातील शर्करेवरील परिणाम कमी होतात, तसेच उपवासादरम्यान इन्सुलिन पातळ्यांवर सकारात्मक परिणाम दिसून येतो. तसेच, बदामांच्या सेवनामुळे भूकेचे शमन होते, ज्यामुळे वजनावर नियंत्रण राहते.''
व्यक्तीच्या फिटनेसवर बदामांच्या सर्वोत्तम परिणामांबाबत सांगताना फिटनेस व सेलिब्रिटी इन्स्ट्रक्टर यास्मीन कराचीवाला म्हणाल्या, ''बदामांमध्ये आरोग्यदायी फॅट्स असतात, ज्यांचा ऊर्जा पातळ्यांवर सकारात्मक परिणाम होतो. तसेच बदाम प्रोटीनचे संपन्न स्रोत देखील आहेत. हा पौष्टिक घटक स्नायूबळची वाढ व देखरेखीमध्ये मदत करतो. म्हणून, तुमच्या प्रियजनांना बदामांचा खास बॉक्स गिफ्ट असण्यासह त्यांच्या आरोग्याप्रती उत्तम गुंतवणूक देखील आहे. संतुलित आहाराचे महत्त्व सांगण्यासह मी व्यायामपूर्वी किंवा व्यायामानंतर गुणकारी स्नॅक म्हणून बदामांची शिफारस करते, कारण बदामांमध्ये उत्तम फॅट्स आणि भूकेचे शमन करण्याचे गुणधर्म आहेत.''
न्यूट्रिशन व वेलनेस कन्सल्टण्ट शीला कृष्णास्वामी म्हणाल्या, ''बदामांचा क्यूरेटेड बॉक्स गिफ्ट म्हणून देणे हे उत्तम आरोग्याच्या दिशेने पाऊल आहे, ज्याला प्रत्येकाने प्राधान्य दिले पाहिजे. बदाम स्वादिष्ट व पौष्टिक स्नॅक असण्यासह हृदयाचे आरोग्य देखील उत्तम ठेवतात. संशोधनामधून निदर्शनास येते की, दररोज ४२ ग्रॅम बदाम सेवन केल्याने पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होऊ शकते, तसेच हृदयविषयक आजार होण्यास कारणीभूत जोखीम घटक देखील कमी होतात. नियमित बदामांचे सेवन केल्याने एकूण कोलेस्ट्रॉल, एलडीएल-कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील शर्करेच्या पातळ्या नियंत्रणात राहण्यास मदत होते, तसेच सानुकूल एचडीएल-कोलेस्ट्रॉल पातळ्या राहतात. बदाम सोईस्कर आणि भूकेचे शमन करणारे स्नॅक आहेत, जे कधीही, कुठेही सेवन करता येऊ शकतात. तुमच्या प्रियजनांना विचारशील व आरोग्यदायी गिफ्ट म्हणून बदाम दिल्यास ते वर्षभर त्यांचा आस्वाद घेऊ शकतील.''
लोकप्रिय कन्नड अभिनेत्री प्रणिता सुभाष म्हणाल्या की, त्या दररोज बदामांचे सेवन करतात. प्रियजनांना गिफ्ट म्हणून बदाम देण्याबाबत मत व्यक्त करत त्या म्हणाल्या, ''माझ्या मते, गिफ्ट म्हणून बदाम देणे या प्रसंगासाठी उत्तम निवड आहे. बदाम केअर व विचाराचे प्रतीक आहेत, जे आरोग्य उत्तम राहण्यास मदत करतात. मनोरंजन क्षेत्रातील माझे व्यस्त वेळापत्रक पाहता मी आकर्षक दिसणे महत्त्वाचे आहे. ज्यामुळे मी माझ्या आहाराच्या बाबतीत काटेकोरपणे पथ्याचे पालन करते आणि नियमितपणे मूठभर बदामांचे सेवन करण्याची खात्री घेते. सर्वोत्तम बाब म्हणजे बदाम सहजपणे सोबत नेता येतात, ज्यामुळे शूटिंगदरम्यान भूक लागली की, मी बदामांचे सेवन करते आणि त्याद्वारे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.''
तर मग, यंदा व्हॅलेंटाइन्स डेला गोड पदार्थांऐवजी विचारशील आरोग्यदायी ट्विस्टचा अवलंब करा. तुमच्या खास व्यक्तीला बदामांचा क्यूरेटेड बॉक्स गिफ्ट करा आणि अनोख्या पद्धतीने प्रेम व्यक्त करण्यासह त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. स्वादिष्ट चव व अनेक फायदे असलेले बदाम पौष्टिक स्नॅक आहेत, जे तुमच्या आरोग्याला उत्तम ठेवण्यास मदत करते.
###
कॅलिफोर्नियावरून येणारे बदाम हे नैसर्गिक, सत्वयुक्त आणि दर्जेदार आहेत. आल्मंड बोर्ड ऑफ कॅलिफोर्निया हे मार्केटिंग, शेती आणि उत्पादनाच्या सर्व बाजूंवर संशोधन-सिद्ध दृष्टिकोन बाळगत कॅलिफोर्नियातील ७,६०० बदाम उत्पादकांच्या आणि त्यांवर प्रक्रिया करणाऱ्यांच्या वतीने बदामांचा पुरस्कार करते. यापैकी अनेक उत्पादकांच्या कुटुंबांत अनेक पिढ्यांपासून बदामांचे उत्पादन घेतले जात आहे. १९५० साली स्थापन झालेली आणि मॉडेस्टो, कॅलिफोर्निया येथे स्थित आल्मंड बोर्ड ऑफ कॅलिफोर्निया ही एक ना-नफा तत्वावर चालणारी संस्था आहे, जी युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ अॅग्रीकल्चरच्या देखरेखीखाली उत्पादक- अधिनियमित फेडरल मार्केटिंग ऑर्डरचे व्यवस्थापन करते. आल्मंड बोर्ड ऑफ कॅलिफोर्नियाविषयी किंवा बदामांविषयी अधिक माहिती मिळविण्यासाठी www.almonds.in येथे भेट द्या.