मुंबई: आरबीआयने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर सर्वसामान्यांमध्ये त्याचे तीव्र पडसाद उमटले असतानाचा आता भाजपचे मित्रपक्षाचे नेते सदाभाऊ खोत यांनी 2000 च्या नोटाप्रमाणे 500 आणि 100 च्या नोटा देखील चलनातून बाद कराव्यात, असा अजब सल्ला दिला आहे.
पहिल्या नोटबंदीत देशाच्या अर्थव्यवस्था उध्वस्त झाली. जनता बेकारी आणि महागाईने होरपळत असल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. 2000 चा नोटा बदलण्यासाठी नागरिकांना चार महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे. नोटबंदीवरून विरोधकांकडून कडाडून टीका होत असतानाच अशा स्थितीत भाजपचा मित्रपक्ष असलेल्या रयत संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी अजब सल्ला दिला आहे. त्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.