रिपब्लिकन पक्षाची बंजारा आघाडी : बंजारा समाजाला हवय १० टक्के आरक्षण !

Santosh Gaikwad April 04, 2023 06:37 PM

मुंबई दि. ०४ : मुंबईत बंजारा भवन निर्माण करण्यात यावे, तसेच बंजारा समाजाला स्वंतत्र प्रवर्ग करून १० टक्के आरक्षण देण्यात यावे अशी या बंजारा समाजाच्या विविध मागण्यांसाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र आणि केंद्र सरकारकडे रिपब्लिकन पक्ष पाठपुरावा करेल असे प्रतिपादन रिपाइंचे महाराष्ट्रचे सरचिटणीस गौतम सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत केले.


रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्या बंजारा आघाडी च्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी बंजारा समाजाचे जेष्ठ नेते सोमु उर्फ कामु पवार यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा रिपब्लिकन पक्षाचे  प्रदेश सरचिटणीस गौतम सोनवणे यांनी आज मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत केली. त्यावेळी ते बोलत होते.


मुंबईत बंजारा भवन निर्माण करण्याची बंजारा समाजाची मागणी असून याची दखल महाराष्ट्र शासनाने घेवून मुंबईत बंजारा भवन उभारण्यात यावे. मानखुर्द येथील सायन ट्रॉम्बे रोडवरील ट्रॉम्बे उड्डानपुलास संत सेवालाल महाराज यांचे नाव देण्यात यावे अशी बंजारा समाजाची मागणी आहे. तसेच बंजारा समाजाला स्वंतत्र प्रवर्ग करून १० टक्के आरक्षण देण्यात यावे या बंजारा समाजाच्या विविध मागण्यांसाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे सोनवणे यांनी सांगितले.


मुंबईत येत्या दि. 9 एप्रिल रोजी रिपब्लिकन पक्षाचा  मुंबई प्रदेश चा महामेळावा अयोजित  करण्यात आला आहे. या मेळाव्यास मुंबईतील बंजारा समाज हजारोंच्या संख्येने सामील होणार असल्याची घोषणा बंजारा आघाडी चे राज्य अध्यक्ष सोमु उर्फ  कामु पवार यांनी केली. यावेळी रिपाइं बंजारा आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष पदी बाबू सिंह राठोड (कारंजा जिल्हा वाशीम) यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच बंजारा आघाडीच्या  प्रदेश उपाध्यक्ष शंकर सखाराम राठोड (नांदेड) महाराष्ट्र सचिव दिलीप नारायण जाधव (पोहरादेवी जिल्हा वाशीम) महाराष्ट्र संघटक पदी राजेश रामधन राठोड (उमरखेड  जिल्हा यवतमाळ) महाराष्ट्र उपसचिव  उमेश तुकाराम राठोड (पुणे) यांची नियुक्ती करण्यात आली. रिपाइं बंजारा आघाडीच्या मुंबई प्रदेश कार्याकारिणीच्या अध्यक्षपदी संतोष एकनाथ पवार, उपाध्यक्ष  तारू सुभाष राठोड, सचिव  मोहन नामदेव चव्हाण, उपसचिव  नामदेव शिवाजी चव्हाण, संघटक  राजु माणीक साखरे, खजिनदार  गुरुनाथ डी. राठोड,  ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष पदी किसन सोमु पवार, ठाणे जिल्हा अध्यक्ष  गणेश बंडु चव्हाण, उपाध्यक्ष  दिलीप रामु चव्हाण, रायगड जिल्हाध्यक्ष पदी गणेश बदरू चव्हाण, उपाध्यक्ष सुरेश शंकर राठोड आदि पदाधिका-यांची अधिकृत नियुक्ती   जाहीर करण्यात आली.