'बायोहॅकर हे माझे सर्वात बुद्धिमान सहकार्य आहे" : सुनील शेट्टी

Santosh Sakpal July 11, 2023 07:56 PM

 एक उद्योजक, अभिनेता, गुंतवणूकदार आणि मार्गदर्शक सुनील शेट्टी यांचे ललित धर्मानी यांच्यासोबत आगामी मोठी आरोग्यसेवा ‘दि बायोहॅकर’ सुरू करण्यामध्ये सहकार्य

मुंबईः भारतातील आरोग्य क्षेत्रामध्ये क्रांती घडवून आणणे आणि भविष्याची पुनर्व्याख्या करणे ह्या उद्दिष्ट्‌यांसह अनेक व्यवसायांमध्ये गुंतवणूक करणारे उद्योजक आणि अभिनेता सुनील शेट्टी यांनी DIY हेल्थकेअरचा उद्यम ‘दि बायोहॅकर’मध्येही गुंतवणूक केली आहे. मानवी सुधारणा किंवा मानवी आरोग्य सर्वोत्तमीकरणासाठी मानले जाणारे बायोहॅकिंग म्हणजे नवीन युगातील डु–इट–युअरसेल्फ जीवशास्त्र होय. यात आपले आरोग्य, परफॉर्मन्स आणि एकूणच खुशालीमध्ये सुधारणा करण्यासाठी लोक आपल्या शरीर, डाएट आणि जीवनशैलीमध्ये हळूहळू बदल करतात.

फिटनेस प्रेमी श्री. ललित धर्मानी यांनी स्थापन केलेले ‘दि बायोहॅकर’ हे संपूर्ण–सेवा  इंटिग्रेटिव्ह हेल्थ आणि वेलनेस क्लिनिक असून सेल्युलर स्तरावरील सुधारणेवर लक्ष केंद्रित करून आरोग्यसेवा क्षेत्रामध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी वचनबद्ध आहे. चेंबूर येथे मुख्य कार्यालय असलेले ‘दि बायोहॅकर’ लोकांना त्यांची स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती बनवण्यासाठी खास तांत्रिक सुधारणांच्या माध्यमातून त्यांच्या शरीर आणि मनाला ‘हॅक’ करण्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या सेवा प्रदान करते. ‘दि बायोहॅकर’ येथील इंटिग्रेटेड मेडिकल प्रॅक्टिशनर्सचे मत आहे की व्यक्तीच्या एकूणच आरोग्य आणि वेलनेसचे ट्रॅकिंग आणि सुधारणा करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जाऊ शकतो.
ह्या सहकार्याबद्दल सुनील शेट्टी म्हणाले, “मी ‘दि बायोहॅकर’मध्ये केलेल्या माझ्या गुंतवणूकीबद्दल अतिशय उत्साहात आहे कारण आजपर्यंतची ही नक्कीच माझी सर्वांत समंजस गुंतवणूक आहे. यात बायोहॅकिंगचा वापर करुन व्यक्तिगत आरोग्य आणि समाजावरील प्रभावाचा शोध घेतला जातो. लोकांच्या जीवनशैलीमध्ये सुधारणा आणण्यासाठी आरोग्यसेवा आणि फिटनेस क्षेत्रामध्ये अतिशय वेगाने वाढ झाली आहे. मला ‘दि बायोहॅकर’मध्ये रूचि आहे कारण वेलनेस प्रदान करताना थेट निदानापासून उपचारांपर्यंत ते उच्च–प्रतीच्या तंत्रज्ञानाचा वापर करतात. यातून आपल्या गुणसूत्रांची जडणघडण, वंशवेल आणि सर्वोत्तम आरोग्यासाठी पोषक तत्त्वे आणि जीवनशैली निवडींचे सुयोग्य मिश्रण शोधणे हे त्यांचे ध्येय आहे. पुढील काही वर्षांमध्ये, बायोहॅकिंग हे एक अतिशय शक्तीशाली साधन असेल जे आपण आरोग्य, पोषण आणि मानवी क्षमता यांबद्दल आपण कसा विचार करतो यांमध्ये क्रांती आणेल. विज्ञान, तंत्रज्ञानाचे हे मोहक जग असून जागतिक स्तरावर अभिनव कंपन्या ह्या चळवळीला चालना देत असून आता हे भारतातही उपलब्ध आहे. यात तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तुम्ही केवळ तुमच्या शरीरातच सुधारणा करत नाही तर इतरांना प्रेरणा देण्यासाठी तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीमध्येही भर टाकली जाते.”
‘दि बायोहॅकर’चे संस्थापक ललित धर्मानी म्हणाले, “नवीनतम प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक तंत्रांच्या माध्यमातून लोकांची प्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी आणि त्यांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी त्यांच्या वर्तन आणि जीवनशैलीमध्ये बदल करण्याचे आमचे ध्येय आहे. सेल्युलर स्तरावर व्यक्तीच्या आरोग्याचे मॉनिटरिंग, डेटा विश्लेषण आणि हाय–टेक चाचण्यांसह हे होईल. आरोग्य सर्वोत्तमीकरण आणि दीर्घायुष्य यांसाठी मानवीय शरीराच्या विभिन्न चाचण्यांसाठी इन–हाऊस सुविधांसह भारतात आमची केंद्रे प्रस्थापित करण्यात येत आहे. व्यक्तीचे जैविक म्हणजेच बायोलॉजिकल वय कमी करण्यावर आमचे लक्ष केंद्रित असून त्यामुळे एकूणच आरोग्य चांगले राखले जाईल.”
बायोहॅकिंगच्या वाढत्या जागतिक चळवळीमध्ये उपचार आणि आरोग्यसेवा यांच्या पारंपारिक पद्धतींमध्ये बदल घडवून आणण्याची क्षमता आहे. IV थेरेपि, हायपरबेरिक ऑक्सिजन थेरेपि, रेड लाईट थेरेपि, कम्प्रेशन थेरेपि, इंफ्रारेड ओझोन थेरेपि आणि व्हिटॅमिन शॉट्‌ससह इंट्राव्हेनस लेजर थेरेपि, IV ओझोन थेरेपि, NAD+ प्लस थेरेपि, पेप्टाईड थेरेपि अशा हाय–टेक थेरेपिज्‌च्या साहाय्याने अनुवंशिकतेच्या शक्तीचा वापर करून “दि बायोहॅकर”व्यक्तीच्या आरोग्याचे सर्वोत्तमीकरण करण्याचे ध्येय राखते. प्रगत टेस्टिंगमध्ये बायोमार्कर्स – DNA टेस्ट, गट मायक्रोबायोम टेस्ट, ऑलिगोस्कॅन आणि व्हिवू युरिन अॅनालिसिस, व्यक्तिगत डाएट्‌स, सप्लिमेंट्‌स, प्रोबायोटिक्स यांचाही समावेश आहे. 
सुनील शेट्टी हे एक नावाजलेले गुंतवणूकदार आणि व्हेंचर कॅपिटलिस्ट आहेत. 2020 साली प्रि–सीरीज ए फंडिंगमध्ये सिकोआ कॅपिटलकडून फंडिंग मिळवलेल्या FITTR मध्ये गुंतवणूकीनंतर आरोग्यसेवा उद्योगामधील “दि बायोहॅकर” ही त्यांच्या गुंतवणूकींमधील भर आहे. ह्याआधी त्यांनी व्हेंचर कॅटालिस्ट आणि मॅरिको लिमिटेडकडून फंडिंग मिळवलेल्या मेन्स ग्रूमिंग कंपनी बीअर्डोमध्ये, न्यूट्रास्युटिकल उत्पादनांचा समावेश असलेला विज्ञानावर आधारित भारतीय वेलनेस समूह बॉडीफर्स्ट वेलनेस न्यूट्रिशन प्रा.लि.मध्ये आणि कुठल्याही फिलर्सशिवाय शरीरातील मेद (फॅट्‌स) घटवून लीन मसल्स कायम राखण्यात मदत करणाऱ्या प्रोटिन वॉटरचे उत्पादन करणारा फिटनेस स्टार्ट अप अॅक्वाटेनमध्येही गुंतवणूक केली आहे.