आव्हाडांविरोधात भाजपचे राज्यभर आंदोलन, भुजबळांकडून पाठराखण !
Santosh Gaikwad
May 30, 2024 10:33 PM
मुंबई : महाडच्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी बाबासाहेबांचा अवमान केल्याचा आरोप करीत भाजपने आव्हाडांविरोधात राज्यभर आंदोलनं केले. मात्र सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी पाठराखण आणि शरद पवार यांनी पाठराखण केली. भुजबळांच्या पाठराखण केल्यानंतर आव्हाडांनी भुजबळांचे आभार मानले.
जितेंद्र आव्हाड यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ सांगली, नांदेड, रत्नागिरी, कोल्हापूर, नागपूर, ठाणे आणि मुंबई मंत्रालयाबाहेर भाजपकडून आंदोलन करण्यात आले आहे. कोल्हापूरच्या ऐतिहासिक बिंदू चौकात जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन करण्यात आले आहे. माणगांवमध्ये भाजपकडून जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करण्यात आला आहे. भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. मुंबई गोवा हायवेवर जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. आव्हाडांच्या प्रतिमेचंही दहन केलं. आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचीही मागणी केली आहे.
शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृती मधील दोन श्लोकांचा समावेश करण्याच्या राजय शासनाच्या निर्णयाविरोधात महाड येथे आंदोलन करताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून अनावधानाने डॉ बाबाहसोब आंबेडकरांच्या प्रतिमेची विटंबना झाल्याने भाजप शिवसेना शिंदे गटाकडून आव्हाडांविरोधात राज्यभर आंदेालन केले जात आहे या प्रकरणावर बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी मात्र आव्हाड यांची पाठराखा केली आहे इतकेच नव्हे तर शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील श्लोकांच्या समावेश करू पाहणा-या शिक्षण विभाग आणि लोशलेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांची कानटोचणी करत भुजबळ यांनी महायुतीलाही घरचा आहेर दिला आहे
काय म्हणाले भुजबळ
भुजबळ म्हणाले की जितेंद्र आव्हाड हे खूप चांगल्या भावनेने तिथे गेले होते तिथे त्यांच्या हातून चुकून काहीतरी झाले. तो कागद फाडताना त्यांनी त्यावर कोणाचा फोटो आहे ते पाहिले नव्हते त्या प्रकरणी त्यांनी जाहीर माफी देखील मागितली आहे. त्यामुळे आव्हाडांवर टीका करत बसण्यापेक्षा आपण त्यांची भावना लक्षात घेतली पाहिजे, ते विरोधी पक्षातील असले तरी त्यांच्यावर टीका करण्यात अर्थ नाही मुळ मुद्दयाकडे आपण लक्ष दिले पाहिजे असे भुजबळ म्हणाले.
आव्हाडांनी मानले भुजबळांचे आभार
आव्हाडांनी भुजबळांचे आभार मानले आहे एक्सवर भुजबळ म्हणाले आहे की, मा. भुजबळ साहेब, अनावधानाने काल माझ्याकडून चूक झाली आणि त्या चुकीबद्दल मी कालच जाहीरपणे नतमस्तक होऊन माफी मागितली. आज आपण त्याचा उल्लेख करीत मनुस्मृतीला विरोध केलाच पाहिजे, हा विचार पुढे आणला. मी आपला मनापासून आभारी आहे. मला काल चवदार तळ्यावर , आपल्या मागे इतर पक्षातील कोण उभे राहतील, असा प्रश्न विचारला असता, मी पटकन एकच नाव घेतले, मा. छगन भुजबळसाहेब ! आपल्या मनात बहुजन समाजाविषयी असलेले प्रेम अन् आपली भूमिका मला माहित आहे. त्यामुळेच मी इतक्या अधिकाराने मी आपले नाव घेतले. आपण ज्या पद्धतीने माझ्या मागे उभे राहिलात त्याबद्दल मी आपला कायम ऋणी राहीन. मनुस्मृतीविरोधातील आपली लढाई आपण सगळे एकत्रित लढू, हीच आपली सर्वांची भूमिका असली पाहिजे.