भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळेंना मराठा समाजाकडून काळे झेंडे

Santosh Gaikwad October 29, 2023 03:56 PM


कल्याण : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे कल्याण मधील टिळक चौकात  जनतेशी संवाद साधला. यावेळी केंद्रीय मंत्री कपिल पाटील हे सुद्धा उपस्थित होते. यानंतर मोदी मोदीच्या घोषणेत ते स्टेजवर जाताच मराठा समाजाच्या वतीने त्याना काळे झेंडे दाखवत त्यांचा निषेध करण्यात आला. यावेळी गो बॅक बावनकुळे आणि एक मराठा लाख मराठाच्या घोषणा मराठा कार्यकर्त्यानी दिल्या. अचानक झालेल्या या निषेधामुळे आंदोलनकर्त्यांना पकडण्यासाठी पोलिसांची दमछाक झाली.   


पोलिसानी वेळातच  तातडीने हस्तक्षेप करत आंदोलन कर्त्याना बाजुला करत बाजारपेठ पोलिस ठाण्यात नेल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे यावेळी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील हे उपस्थित होते. हा सर्व गोधंळ पाहून भाजपच्या कार्यकत्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे भिवंडी लोकसभा मतदार संघातील भिवंडी आणि कल्याणमध्ये आज दिवसभर दौऱ्यावर आहेत. मात्र शेवट्याच्या टप्प्यातील कार्यक्रमात अचानक मराठा समाजाचे कार्यकर्ते मराठा आरक्षणासाठी आक्रमण झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.