मुंबई : को-ऑपरेटीव्ह बँक एम्प्लॉईज युनियनतर्फे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त यंदाही २३ जानेवारी, २०२४ रोजी सकाळी ९.०० ते सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन दादर पश्चिम येथील युनियन कार्यालय परिसरात करण्यात आले आहे.
आपल्या देशातील रुग्णांना रक्ताची असलेली गरज लक्षात घेऊन युनियनतर्पेâ प्रतिवर्षी दोन-तीन वेळा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम उत्साहात राबविण्यात येतो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या जयंतीला युनियनचे सभासद मोठ्या संख्येने रक्तदान मोहिमेत सामील होऊन आदरांजली व्यक्त करीत असतात. त्यामुळेच रक्तदान शिबिराचे जयंतीदिनी सातत्य राखण्यासाठी युनियनचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली युनियनचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते विशेष प्रयत्नशील असतात. यंदा रक्त पिशव्यांचा उच्चांक गाठण्याचे उद्दिष्ठ आहे. केईएम हॉस्पिटलच्या रक्तपेढी सहकार्याने हे शिबीर साकारण्यात येणार आहे.