कुर्ला स्टेशन येथे बस सेवा बंद

Santosh Sakpal December 11, 2024 07:51 PM

शिवनेर 

मुंबई: सोमवारी कुर्ला येथे झालेल्या बस दुर्घटनेनंतर नागरिकांना बस सेवेबाबत मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या दुर्घटनेनंतर मंगळवार आणि बुधवारी कुर्ला स्टेशन येथे बस सेवा बंद ठेवण्यात आली असून, सध्या केवळ कुर्ला डेपोपर्यंत बस सेवा सुरु आहे.

यामुळे प्रवाशांना दररोजच्या प्रवासात अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बेस्ट प्रशासनाकडे तात्काळ बस सेवा पूर्ववत करण्याची मागणी केली आहे. नागरिकांना होणाऱ्या त्रासावर लवकरात लवकर तोडगा काढण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.