वेल्‍ला प्रोफेशनल्‍सकडून मुंबईतील लुक ॲण्‍ड लर्न सेमिनारच्‍या माध्‍यमातून क्रोमॅटिक २.० कलेक्‍शन लाँच

SANTOSH SAKPAL March 29, 2023 01:48 PM

मुंबई : क्रोमॅटिक कलर कलेक्‍शनच्‍या यशानंतर जगातील अग्रगण्‍य कलर ब्रॅण्‍ड वेल्‍ला प्रोफेशनल्‍स क्रोमॅटिक २.० कलर कलेक्‍शनच्‍या लॉन्‍चसह परतला आहे. नवीन एडिशन हेअरस्‍टायलिस्‍ट्सना त्यांच्या सर्जनशीलतेसह प्रयोग करण्यास प्रोत्साहित करते आणि ग्राहकांना त्यांची स्वतःची अनोखी शैली दररोज दाखवण्यास मदत करते! या ब्रॅण्‍डने या वैविध्‍यपूर्ण कलेक्शनचे अनावरण २३ मार्च २०२३ रोजी मुंबईत त्याच्या इंटरॲक्टिव्ह लुक  ॲण्‍ड लर्न सेमिनारसह केले, ज्यामध्ये वेल्‍ला पॅशनिस्ट – नताशा नीगमवाला आणि निखिल शर्मा कलर टेक्निक्‍स व स्‍टायलिंग डिकोड करत होते. 

 नवीन वेल्‍ला क्रोमॅटिक कलेक्‍शन नवीन सेलिब्रिटीज – नीलम कोठारी, प्रकृती मिश्रा, शिवलीका ओबेरॉय व रोहित खंडेलवाल यांना ४ वेल्‍ला पॅशनिस्‍ट – नताशा नीगमवाला, एल्‍टन स्टिव्‍ह व्‍हेसोकर, प्‍लॅसिड ब्रेगांझा व निखिल शर्मा यांनी निर्माण केलेल्‍या सानुकूल लुक्‍समध्‍ये दाखवते. वेल्‍लाचे हे वैविध्‍यपूर्ण कलेक्‍शन हेअरस्‍टायलिस्‍ट्सना त्‍यांच्‍या क्‍लायंट्सना शोभेल असे सानुकूल लुक्‍स तयार करण्‍यास आणि लोकांना त्‍यांचे व्‍यक्तिमत्त्व अंगिकारून त्‍यांची स्‍वत:ची अद्वितीय ओळख निर्माण करण्‍यास प्रेरित करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहे. हे कलेक्‍शन केसांना कलर करण्‍याबाबत असलेली समज देखील मोडून काढते आणि लोकांना दैनंदिन ॲक्‍सेसरी म्‍हणून केसांना कलर करण्‍यास प्रेरित करते. ४ अद्वितीय सानुकूल लुक्‍ससह कलेक्‍शनमध्‍ये सर्व कलरर्ससाठी काहीतरी आहे, मग तुमचा वाइब आकर्षक, उत्‍साही, मोहक असो किंवा एजी असो!

सेमिनारमध्‍ये वेल्‍ला पॅशनिस्ट्स सेलिब्रिटी लूक्‍सना मंचावर प्रत्‍यक्ष डीकोड करत होते आणि प्रेक्षकांशी त्‍यांचे ‘स्‍वत:चे सिग्‍नेचर’ लुक्‍स तयार करण्‍याकरिता टिप्‍स व ट्रिक्‍सबाबत संवाद साधत होते. 

वेल्‍ला कंपनीचे दक्षिण आशियामधील महाव्‍यवस्‍थापक श्री. प्रवेश साहा 

आमचा ब्रॅण्‍ड वेल्‍ला प्रोफेशनल्‍स आंतरराष्‍ट्रीय ट्रेंड्सच्‍या बाबतीत अत्‍यंत नाविन्‍यपूर्ण गोष्‍टी सादर करत भारतात केशभूषा कलेला नव्‍या उंचीवर नेण्‍यावर लक्ष केंद्रित करतो. क्रोमॅटिक २.० हे आमचे नवीन लॉन्‍च करण्‍यात आलेले कलेक्‍शन हेअरड्रेसर्सना त्‍यांची सर्जनशीलता व्‍यक्‍त करण्‍यासोबत ग्राहकांना केसांच्‍या रंगाबाबत भेडसावणाऱ्या समस्‍यांचे निराकरण करण्‍याकरिता कॅन्‍व्‍हास देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहे. आज ग्राहक अभिव्‍यक्‍ती व व्‍यक्तिमत्त्वाला अधिक महत्त्व देतात. आमचे ४ सेलिब्रिटी भागीदार - नीलम, प्रकृती, शिवलीका व रोहित यांचे व्‍यक्तिमत्त्व वैशिष्‍ट्यपूर्ण आहे आणि त्‍यांचे सानुकूल लुक्‍स प्रत्‍यक्षात सादर होण्‍यासोबत आमच्‍या निदर्शनास आणतात की, तुम्‍ही तुमच्‍या हेअरड्रेसरसोबत सहयोगाने अनोखी स्‍टाइल तयार केल्‍यास ती अत्‍यंत करिष्‍माई ठरते. आमचा ठाम विश्‍वास आहे की हेअर कलर सर्वांसाठी आहे, तुम्‍हाला तुमचा वाइब शोधण्‍यामध्‍ये मदत करूया