लालबाग राजाच्या दरबारी भक्तांचे हाल : व्हीआयपी दर्शन बंद करण्याची मागणी !
Santosh Gaikwad
September 23, 2023 03:02 PM
मुंबई : लालबाग राजाच्या दरबारी भक्तांचे हाल होताना दिसत आहे. गर्दीत स्वयंसेकांकडून आलेल्या भक्तांना रेटारेटी करण्यात येत आहे. सलग पाचव्या दिवशी दर्शनासाठी मोठी गर्दी होती. काही भक्तांकडून स्वयंसेवकांना रेटारेटी करण्यात आली आहे. तर गर्दीमुळे एका महिलेला चक्कर देखील आली होती. तर दुसऱ्या महिलेला दर्शनापासून खाजगी सुरक्षा रक्षक खेचून घेऊन जाताना पाहायला मिळत आहे. दरम्यान लालबागच्या राजाचे व्हीआयपी दर्शन बंद करा अशी मागणी मुंबईच्या डबेवाल्यांनी केली आहे.
गणेशभक्त चोवीस चोवीस तास रांगेत उभे राहून लालबागच्या राजाचे ओझरतं दर्शन घेत आहेत तर दुसरीकडे खास व्यक्तींना व्हिआयपीच्या नावाखाली थेट लालबाग राजाच्या पाया जवळ नेऊन दर्शन दिले जात आहे. याबद्दल मुंबई डबेवाला असोशिएशन अध्यक्ष सुभाष तळेकर यांनाही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. लालबागच्या राजाचे व्हीआयपी दर्शन बंद करा अशी मागणी डबेवाल्यांनी केली आहे.
रांगेत दर्शन घेणाऱ्या भक्तांना रेटा रेटीला सामोरे जावे लागते आहे. काही ठिकांणी मंडळांचे स्वयंसेवक भक्तांना धक्का बुक्की करत आहेत.नियोजनाचे तीन तेरा वाजले आहेत. मांढरगडावर जशी चेंगराचेंगरी होऊन अनेकांचे प्राण गेले तशी परिस्थिती लालबागच्या राजाच्या ठिकांणी कधी ही घडू शकते अशी परिस्थिती आहे. एक गणेशभक्त दर्शनासाठी रांगेत चोविस तास उभा राहतो मात्र व्हिआयपी गणेशभक्त थेट श्रीच्या चरणी जातो हा भेदा-भेद लालबागचा राजा मंडळाने बंद करावा अशी मागणी डबेवाल्यांनी केली आहे.
शुक्रवारी उर्फी जावेद या मॉडेलला व्हिआयपी च्या नावा खाली थेट श्रीच्या चरणी दर्शनाला नेण्यात आले.हे मात्र खटकणारे आहे. उर्फी चे समाजासाठी , देशासाठी काय योगदान आहे याचे उत्तर व्यवस्थापकांनी द्यावे.ही दर्शनाला रांग लावलेल्या गणेश भक्तांची थट्टा आहे. देवाने भक्ता भक्तानं मध्ये भेदभाव केला नाही मग लालबागचा राजा मंडळ भक्तां भक्तानं मध्ये भेदभाव कसे करू शकते असा सवाल ही तळेकर यांनी विचारला आहे. उर्फी जावेद यांचे मुंबईसाठी काय योगदान आहे माहीत नाही,पण डबेवाल्यांची मुंबईसाठी थोडे का होईना योगदान निश्चित आहे.जर डबेवाला कामगार लालबागचा राजा दर्शनास आला तर मंडळ त्या व्हिआयपी दर्शन देईल का असा सवाल ही तळेकर यांनी विचारला आहे.