पायाभूत सुविधा प्रकल्पांवर शुक्रवारी कॉन्क्लेव्ह

Santosh Gaikwad August 27, 2024 08:41 PM


मुंबई : महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ ( एमएसआरडीसी) प्रायोजित व दै शिवनेरी आयोजित पायाभूत सुविधा प्रकल्पांवर कॉन्क्लेव्ह चे आयोजन  करण्यात आले आहे. शुक्रवार दि ३० ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११ ते संध्याकाळी ५ पर्यंत या वेळेत हॉटेल साहिल, समोर. सिटी सेंटर मॉल, मुंबई सेंट्रल एसटी डेपोजवळ, मुंबई- ४००००८  येथे ही  कॉन्क्लेव्ह पार पडणार आहे. दैनिक शिवनेरचे संपादक नरेंद्र वि वाबळे यांनी या  कॉन्क्लेव्ह चे  आयोजन केले आहे.