मुंबईः पायाभूत प्रकल्पांच्या आधारे महाराष्ट्राचा चौफेर विकास होत असताना मुंबईत शुक्रवार दि. ३० ऑगस्ट २०२४ रोजी पायाभूत प्रकल्पांवर एका परिषदेचे आयोजन करण्यात आले असून प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व कार्यकारी संचालक अनिलकुमार गायकवाड यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
मुंबई सेंट्रल येथील हॉटेल साहील मध्ये सकाळी ११.०० वा सुरु होणा-या या परिषदेचे थीम आहेः ‘पायाभूत प्रकल्पः चौफेर प्रगतीचा संकल्प.’ याच विषयावर श्री. गायकवाड आपल्या उद्घाटनपर भाषणात पहिले पुष्प रचणार आहेत.
ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे हे याप्रसंगी सन्माननिय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या परिषदेतील प्रमुख वक्ते पुढील विषयांवर बोलणार आहेतः १)पायाभूत प्रकल्प आणि ग्रामीण विकास- डॉ. दिलीप पांढरपट्टे, सदस्य, महाराष्ट्र लोकसेवा आयोग.
२) पायाभूत प्रकल्पांचे कृषी विकासाशी नाते -. प्रकाशभाऊ पोहरे कृषीतज्ञ, संपादक दैनिक देशोन्नती
३) पायाभूत प्रकल्पात माध्यमांचा सहभाग- देवेंद्र भुजबळ माजी संचालक माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य.
शिवनेर व लाईफ रिटेल या संस्थांनी या परिषदेचे आयोजन केले असून यू ट्यूब व फेसबुकवर या परिषदेचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.