महाराष्ट्राच्या सत्ताबदला’वर सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे ताशेरे, ही भाजप’ला चपराक ; काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी
Santosh Gaikwad
May 11, 2023 07:12 PM
मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयाचा निकार्ल घटनात्मक तरतुदींवर असुन, (ठाकरे यांच्या) मुळ शिवसेना पक्षाचा व्हीप वैध असल्याचे स्पष्ट करून, १६ आमदारांवरील कारवाईचे थेट व स्पष्ट संकेत विधानसभा अध्यक्षांना देतांना ‘योग्य वेळेत’ (reasonable time) निर्णय करण्याची अपेक्षा ही विधानसभा अध्यक्षांकडून व्यक्त केली, याचा अर्थ १६ आमदारांवरील कारवाई’चा मुद्दा रद्द होत नाही असे प्रतिपादन काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालयाचे निकाला नंतर दिली..! या निर्णयाने विद्यमान ‘मुख्यमंत्री व मंत्र्यासह १६ आमदारांवरील’ निलंबनाची कार्यवाही टाळता येणार नाही’ हेच स्पष्ट झाले असुन, तो निर्णय विधानसभा अध्यक्षांनी शेड्युल १० प्रमाणे (पुर्व परिस्थिती गृहीत धरून) ‘अपेक्षीत निलंबनाची संविधानीक कारवाई’ करावी अशीच स्पष्ट अपेक्षा व्यक्त केली.. याचा अर्थ ‘विद्यमान मुख्यमंत्र्यांना क्लीन चिट वा जिवदान’ दिले असा होत नसल्याचे देखील स्पष्ट केले.
महाराष्ट्राच्या सत्ताबदला’वरील सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे हीच भाजप’ला चपराक असुन, ‘संविधान_भिमुख’ कारभार करण्याची भाजप’ची पात्रता नाही.. हेच सिध्द होत असल्याची प्रखर टिका काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली..!
मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निकाला विषयी चुकीचा अर्थ सांगत जनतेची दिशाभूल करत असुन, सर्वोच्च न्यायालयाचे निर्णयाचे चुकीचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न करत आहेत. असा प्रयत्न करणे एक प्रकारे न्यायालयाचा अवमान असल्याचा आरोप काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केला. सत्तेच्या हव्यासा पोटी सर्वोच्च न्यायालयाचा अवमान प्रकरणी फडणवीसांची कायद्याची पदवी अडचणीत येऊ शकते असा ईशारा ही दिला..!
महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावरील सर्वोच्च न्यायालयाचे खंडपीठाने दिलेल्या निकालात “राज्यपाल कोशारीं च्या असंवैधानिक दुष्कृत्यांवरील प्रखर टीका” याचा किमान बोध खरेतर भाजप च्या नेतृत्वाने घेणे व स्वकर्मांचे आत्मचिंतन करणे जास्त गरजेचे असल्याचे ही काँग्रेस प्रवक्ते गोपाळदादा तिवारी म्हणाले.