कोलकातामध्ये दोन मुलींनी राष्ट्रगीताचा केला अवमान, हातात सिगारेट घेऊन राष्ट्रगीत गाताना काढला व्हिडिओ
SANTOSH SAKPAL
April 12, 2023 07:24 PM
कोलकाता : पश्चिम बंगालच्या कोलकातामध्ये दोन मुलींनी राष्ट्रगीताचा अवमान केला. याचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये दोन्ही मुली हातात सिगारेट घेऊन राष्ट्रगीत गात असून राष्ट्रगीताचा अवमान करताना दिसत आहेत. ही घटना उघडकीस आल्यानंतर कोलकाता पोलिसांनी रविवारी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत कोलकता उच्च न्यायालयाच्या वकिलासह अनेकांनी या मुलींवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर बराकपूर सायबर सेलमध्ये दोन्ही मुलींविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला.
पोलिसांनी सांगितले - दोन्ही मुली अल्पवयीन
बराकपूरच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मुलींचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. दोघेही अल्पवयीन आहेत. तपस एजन्सी डेटा मिळवण्यासाठी फेसबुकच्या संपर्कात आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, सोशल मीडियावर लोक खूप संतप्त झाले. ज्यामुळे मुलींनी व्हिडिओ आधीच डिलीट केला होता.
राष्ट्रगीताचा अपमान केल्यास काय शिक्षा?
कोणत्याही राष्ट्रीय चिन्हाचा अपमान करणे प्रतिबंधित आहे. या अंतर्गत उल्लंघन करणाऱ्यांना तुरुंगवास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. राष्ट्रीय सन्मान कायदा, 1971 च्या कलम 3 मध्ये नमूद केल्याप्रमाणे. जो कोणी जाणूनबुजून राष्ट्रगीत गाण्यास प्रतिबंध करेल किंवा राष्ट्रगीत म्हणताना कोणत्याही प्रकराची गडबड किंवा अनादर घडवून आणेल, त्याला तीन वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होते.