डोंबिवलीतील धोकादायक केमिकल कंपन्या ४ जूननंतर स्थलांतरीत करणार : उदय सामंत
Santosh Gaikwad
May 23, 2024 06:57 PM
डोंबिवली : एमआयडीसीतील केमिकल कंपनीत झालेल्या स्फोटानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. एमआयडीसी परिसरातील धोकादायक कंपन्या स्थलांतर करण्याची मागणी डोंबिवलीकरांनी अनेक दिवसांपासून लावून धरली होती मात्र आचारसंहिता असल्यामुळे हे काम थांबलं होतं ४ जूननंतर केमिकल कंपन्या शिप्ट करण्याची प्रक्रिया सुरू होईल असे सामंत यांनी सांगितले.
सामंत म्हणाले, डोंबिवलीतील सर्व धोकादायक कंपन्या शिप्ट करण्यात येणार आहे वर्षभर यावर काम सुरू आहे जागा शोधण्यात आली आहे मात्र अद्याप जागेचे वाटप करण्यात आलेलं नाही डोंबिवलीकरांच्या मागणीवर धोरणात्मक निर्णय घेतला आहे त्यासाठी अंबरनाथ परिसरात शेकडो एकर जागा घेण्यात आली असल्याचं सामंत यांनी सांगितलं
कंपनीतील आग आटोक्यात आली असून सहा मृतदेह सापडल्याची माहिती त्यांनी दिली. दुर्घटनेतील सर्व जखमींचा खर्च सरकार उचलणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तसं जाहीर केलं आहे मात्र घटना दुदैवी आहे या कंपन्यांमध्ये नियमबाह्य काही झालं आहे का ? याची तपासणी करण्याच्या सूचना अग्निशमन दलाला दिल्या आहेत तसंच या घटनेची सखाेल चौकशी करण्याचीही मागणी केली आहे यात कोणी दोषी आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
सहा महिन्यात निर्णय घेणार : श्रीकांत शिंदे
अतिधोकादायक रसायनं तयार करणाऱ्या कंपन्या शहराच्या बाहेर नेल्या जाव्यात अशी मागणी स्थानिकांकडून केली जाते आहे. आम्ही यासंदर्भात पुढच्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याशी आम्ही चर्चा करुन याविषयीचा निर्णय घेऊ. येत्या सहा महिन्यांत इथल्या अतिधोकादायक केमिकल तयार करणाऱ्या कंपन्या शहराबाहेर कशा नेता येतील यावर आम्ही लक्ष केंद्रीत करणार आहोत. असं श्रीकांत शिंदेंनी म्हटलं आहे. या दुर्घटनेत ३० जण जखमी झाले असून त्यांना एम्समध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे सर्व जखमींना मदत करण्यात येणार आहे असे श्रीकांत शिंदे यांनी सांगितल.
़़़़