नागपूर दि. 8 :- विरोधी पक्षाच्या नेत्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलू दिले नाही. विरोधी पक्षाने सभात्याग केल्यावर विरोधीपक्ष नेत्यांच्या अनुपस्थितीत विधेयके घाईगडबडीत मंजूर करून घेतल्याने विधानसभा अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
आज विरोधकांचा सभात्याग असताना सत्ताधारी पक्षाने लक्षवेधी थांबवून विरोधक नाहीत ही संधी साधून वादग्रस्त चिटफंड, वस्तू सेवा कर विधेयक मंजूर करून घेतले. वस्तू सेवा कर या विधेयकद्वारे ऑनलाईन गेमिंग, लॉटरी, बेटिंग, ऑनलाईन कॅसिनो याला अधिकृत करण्याची मंजुरी मिळाली. ही विधेयक तरुण पिढीसाठी धोकादायक असताना त्यावर विरोधकांना चर्चा करायची होती. पण चर्चा न करता ही विधेयक मंजूर केल्याने अध्यक्षांना भेटून व्यक्त केली नाराजी व्यक्त केली.