मोठी बातमी : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना इडीची नोटीस

Santosh Gaikwad May 11, 2023 09:09 AM


मुंबई : राज्याच्या सत्ता संघर्षाच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष वेधले असतानाच राष्ट्रवादी काँगेस चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना इडीने नोटीस बजावली आहे त्यांना सोमवारी ईडी कार्यालयात  चौकशीला हजार राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. IL&FS प्रकरणी जयंत पाटलांना नोटीस धाडल्याची माहिती समोर आली आहे.



राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या जवळचे आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला शह देण्यासाठी ही नोटीस बजावण्यात आल्याची चर्चा आहे. येत्या सोमवारी जयंत पाटील यांची ई़डीकडून चौकशी होणार आहे. आयएल आणि एफएलएसच्या माध्यमातून आर्थिक मोठा गैरव्यवहार केला गेला असल्याचा आरोप करण्यात आला होता. आयएलएफस आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात जयंत पाटील यांना ही नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, आता या नोटीसवर जयंत पाटील काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे. 


दरम्यान, महाराष्ट्र सत्तासंघर्षाचा आज निकाल येणार आहे. त्याचवेळी ईडीची नोटीस आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. राष्ट्रवादीवर दबाव टाकण्याचा हा प्रकार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. जयंत पाटील यांना ईडीची नोटीस बजावण्यात आल्याने राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना धक्का बसला आहे.