४८ वर्षापूर्वीच्या शाळेतील आठवणींना उजाळा दिला....

Santosh Gaikwad June 06, 2023 05:16 PM

शिक्षणऋषी म. शं. शिवणकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त अभिवादन सोहळा  संपन्न 


नवी मुंबई :  बाल विद्यामंदिर, परभणी येथील शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षणऋषी म. शं. शिवणकर सर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त अभिवादन सोहळा नुकताच वरुणावतार झुलेलाल मंदिर, नेरुळ, नवी मुंबई येथे पार पडला. शिक्षण संस्थेचे माजी शिक्षक वृंद, शिक्षकेतर माजी कर्मचारी व मुंबई तसेच आसपासच्या परिसरातील माजी विद्यार्थीगण यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी १९७५ पासूनच्या बॅचचे जवळपास १०० विद्यार्थी आणि त्या काळातले २३ शिक्षक ७ शिक्षिका एकत्रीत आल्या होत्या. ४८ वर्षापूर्वीच्या शाळेतील आठवणींना उजाळा दिला. 


बाल विद्यामंदिर शिक्षण संस्था हि परभणी येथील नावाजलेली शिक्षण संस्था असून या शिक्षण संस्थेतील पाच माजी शिक्षकांना राज्यपालांच्या हस्ते आदर्श शिक्षक या पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे. शिक्षणऋषी म. शं. शिवणकर सर यांचा जन्म २४ डिसेंबर १९२४ रोजी झाला. ते दिव्यांग असून देखील त्यांनी तीन विद्यार्थ्यांना घेऊन ज्ञानदानाचे कार्य वर्ष १९४८ पासून सुरू केले. त्यांनी १९४८ मध्ये लावलेले रोपटे हे आज मोठा वटवृक्ष झालेला आहे. आज रोजी संस्थेमध्ये साधारणतः ४५०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिवणकर संराचा राज्यपालांच्या हस्ते शिक्षण क्षेत्रातील महत्वपुर्ण कामगिरी बद्दल गौरव करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन बाल विद्यामंदिर शिक्षण संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले. एम.ए. व्ही.एम. औंडेकर,  नट डी. दीक्षित,  डी.एस्सी. व्ही.एस.एस. राके,  के.एस. डी. अडणे,  व्ही.जी. कुलकर्णी,  पुष्पा देव आणि माजी विद्यार्थी प्रतिनिधी  अनिल गांडी,  रमेश खिस्ते,  अरविंद घुगे,  विश्वास सबनीस यांच्या हस्ते माता सरस्वती पूजन, शिक्षणऋषी M.Sc. शे.एस. शिवणकर सर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. दिप प्रज्वलनानंतर  रुपाली फडके यांच्या सुरेल आवाजात सरस्वती स्तवन व  सुजित देशपांडे यांनी शिवणकर सरांच्या कार्यावर शब्दबध्द केलेल्या कवितेचे गायन सादर केले. त्यानंतर बाल विद्यामंदिर शिक्षण संस्थेचे दिवंगत शिक्षक व कर्मचारी यांचे स्मरण करून भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. टीव्ही व सिने कलाकार अजिंक्य राऊत यांनी देखील  उपस्थित राहुन शाळेच्या आठवणीना उजाळा दिला. मंजुषा शेळगावकर व  अनघा लंगर भालेराव यांनी सुत्रसंचालन केले. 


माजी विद्यार्थ्यांना आवाहन

मुंबई व आसपासच्या परिसरातील बाल विद्यामंदिर, परभणी या शिक्षण घेतलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येते की, संराच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त होणा-या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी व आपल्या शाळा मित्राच्यां संर्पकात राहण्यासाठी  के. डी. आडणे सर, मोबाईल.नं. ९४२२१७९३२१ व  विश्वास सबनिस मोबाईल नं. ९३२६२७६८९६ यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.